स्वेरीचे वारीपुर्व स्वच्छता अभियान मोलाचे -गटविकास अधिकारी रविकिरण घोडके - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 8 July 2019

स्वेरीचे वारीपुर्व स्वच्छता अभियान मोलाचे -गटविकास अधिकारी रविकिरण घोडकेस्वेरीच्या विद्यार्थ्यांनी गोपाळपूर केले चकाचक!
पंढरपूरः- ‘स्वेरी’ ही शिक्षण संस्था आता केवळ जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली नसून उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच सामाजिकतेची जाण ठेवून त्यांच्या हातून होत असलेल्या कार्याची ओळख संपूर्ण विश्वात झाली आहे. स्वेरीचे सर्वेसर्वा डॉ. रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या दिशेने झेपावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक कार्याबरोबरच विधायक आणि सामाजिक कार्य करण्याची जिद्द, तळमळ आणि प्रचंड उर्जा देखील दिसत असते. आषाढी वारीच्या नियोजन काळात प्रशासनाला स्वेरीची खूप मदत मिळते. स्वेरीचे नियोजनात्मक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. शिक्षणात ज्याप्रमाणे त्यांनी गरुड झेप मारली आहे. त्याप्रमाणे सामाजिक कार्यातून देखील सांघिक कार्याची ओळख अधिक गडद दिसून येते. यामुळेच स्वेरी शिक्षण संस्थेचा गोपाळपुरला सार्थ अभिमान आहे व त्यांचे आषाढी वारीपुर्व स्वच्छता अभियान वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोलाचे ठरत आहे.’ असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी केले.
         आषाढीवारी पूर्वीची स्वच्छता अभियानाच्या निर्मल वारी, स्वच्छ वारी, याच्या पार्श्वभूमीवर स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ आणिकमवा आणि शिका’ योजनेमधील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन गोपाळपूर परिसर स्वच्छ केला.स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर मधील शिवाजी चौक, गोपालकृष्ण मंदिर परिसर, मंदिर चौक, गोपाळपूर ग्रामपंचायत कार्यालय याठीकाणी केलेल्या स्वच्छता अभियानात कमवा आणि शिका’ उपक्रमाचे प्रमुख प्रा. यशपाल खेडकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम.शिंदे व डॉ. रंगनाथ हरिदास यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २५० इतक्या विद्यार्थ्यांनी गोपाळपूर परिसर स्वच्छ केले. पाटी, खोऱ्या व कुदळ यांच्या सहाय्याने प्लास्टिक पिशव्या, केर-कचरा एकत्रित गोळा करून एकेठिकाणी जमा करत होते. तेथून ट्रॅक्टरच्या ट्रोलीच्या साह्याने कचऱ्याची विल्हेवाट लावत होते. सरपंच विजयाताई जगताप म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात ‘स्वेरी’ हे महाविद्यालय असे आहे की जे सामाजिकतेची नाळ ओळखून प्रशासनाला वेळोवेळी, सर्वोतोपरी सहकार्य करते.’ यावेळी गटविकास अधिकारी घोडके म्हणाले ‘हे स्वेरीचे विद्यार्थी आहेत त्यामुळे कोणतेही काम अर्धवट सोडणार नाहीत. यावरून स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या कार्याची ख्याती किती सर्वदूर पसरली आहे याची प्रचीती येते. यावेळी गोपाळपूरमध्ये सरपंच विजयाताई जगताप, ग्रामसेविका सौ. उमाताई बंगाळे, समाजसेवक नवनाथ बंगाळे, ग्रामविकास अधिकारी ज्योतीताई पाटील यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते. स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, प्रा. एस.एम. काळे, प्रा. के. एस. पुकाळे, प्रा. ए. एम. कस्तुरे, प्रा. एन. एम, मस्के, प्रा. आर.एन. शिंदे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग कमवा आणि शिका’ योजना व राष्ट्रीय सेवा योजना’ या दोन्ही विभागातील जवळपास २५० विद्यार्थी- विद्यार्थिनी या वारी पूर्व स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी झाले होते. परिसर स्वच्छ ठेवण्याचा ध्यासच जणू स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला असून शैक्षणिक कार्याबरोबरच समाजसेवेची अखंड परंपरादेखील स्वेरीने जपलेली आहे. याचीच चर्चा गोपाळपूर मध्ये होत आहे.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

add