रविवारी पंढरीत मुद्रकांचा(प्रिंटर्स)राज्यस्तरीय मेळावा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 19 July 2019

रविवारी पंढरीत मुद्रकांचा(प्रिंटर्स)राज्यस्तरीय मेळावा


पंढरपूर : प्रिंटींग व्यवसाय हा आज संकटात सापडला असुन या प्रिंटींग व्यवसायात असणार्‍या मुद्रक व
तेथील कामगार यांच्या विषयी शासकिय अनास्था तर आहेच, परंतु राज्यात सुमारे दोन कोटी कामगार या
व्यवसायावर अवलंबुन आहेत. अधिच अडचणीत असलेल्या प्रिंटर्सना कांही दलालांना हाताशी धरुन सॉफ्टवेअर
बनवणार्‍या कंपन्या झिजीया करा प्रमाणे (खंडणी) वसुली करत आहेत. या सर्व अडी-अडचणींचा विचारविनीमय
करण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यभरातील सर्व प्रिंटर्सचा मेळावा पंढरपूर येथे रविवार दि.
21/7/2019 रोजी सकाळी 11 वा. बंकटस्वामी मठ, प्रदक्षणा रोड, कालिकादेवी मंदिराजवळ, पंढरपूर, जि.
सोलापूर याठिकाणी आयोजित केल्याची माहिती महाराष्ट ्र मुद्रक विकास परिषदेच्या मुख्य प्रवर्तकांनी दिली आहे.


सध्या सोशल मिडीया व मोबाईल वरील विविध अ‍ॅपमुळे प्रिंटींग व्यवसाय वरचेवर मंदीत सापडत आहे;
तसेच कांही सॉफ्टवेअर कंपन्या अगदी गुंडगिरी करत खंडणी मागून रेड टकायची धमकी देत आहेत. एवढा मोठा
रोजगार निर्माण करणार्‍या प्रिंटर्ससाठी कोणतेही अधिकृत शासकीय योजना अथवा सवलती नाहीत. बँका या
व्यावसाईकांना सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे हे व्यावसाईक आर्थिक अडचणीत आले असुन त्यांच्यावर
उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रश्‍नांवर विचारमंथन या मेळाव्यात होणार आहे, तसेच अनुभवी प्रिंटर्स
यावेळी सॉफ्टवेअर विषयी मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा पंढरपूर मुद्रक संघाच्या सहकार्याने आयोजित
करण्यात आला आहे. तरी या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने मुद्रकांनी(प्रिंटर्स) उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट ्रमुद्रक विकास परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages