पंढरपूर सिंहगडचे अक्षय माने यांची अभियंता पदी निवड - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 15 July 2019

पंढरपूर सिंहगडचे अक्षय माने यांची अभियंता पदी निवड


पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कोर्टी,  पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये शिक्षण घेतलेले अक्षय माने यांची अभियंता पदी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 
      


कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये आपले सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण केलेले कराड तालुक्यातील निगडी येथील अक्षय रामचंद्र माने यांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता या पदाच्या परिक्षेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग मधील अक्षय माने या विद्यार्थ्यांने कनिष्ठ अभियंता या पदावर उज्ज्वल यश संपादन केले आहे.
    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता या पदावर नियुक्ती झाली आहे. अक्षय माने यांच्या यशाबद्दल पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. चेतन पिसे, शैक्षणिक अधिष्ठाता डाॅ. रविंद्र व्यवहारे आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages