घाबरून जावून चुकीचा निर्णय घेवू नका, स्वेरीमध्ये तिसऱ्या फेरीतून प्रवेश मिळू शकतो -प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 23 July 2019

घाबरून जावून चुकीचा निर्णय घेवू नका, स्वेरीमध्ये तिसऱ्या फेरीतून प्रवेश मिळू शकतो -प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे


पंढरपूर- पहिल्या फेरीमध्ये स्वेरीस मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद व स्वेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या पाहता विद्यार्थ्यांनी घाबरून जावून चुकीचा निर्णय घेऊ नका ‘स्वेरी’मध्ये तिसऱ्या फेरीतून प्रवेश मिळू शकतो.’ असे आवाहन स्वेरी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे यांनी केले.
       प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी संपली असून स्वेरीत प्रेवश न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या विद्यार्थाना डॉ. कचरे मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, ‘बऱ्याचदा विद्यार्थी पहिल्या फेरीसाठी सरकारी व पुण्या-मुंबईच्या महाविद्यालयांना पसंती देत असतात व त्यातून त्यांची प्रथम फेरीमध्ये स्वेरीमध्ये प्रवेश घेण्याची संधी चुकते परंतु दुसऱ्या फेरीमध्ये स्वेरीमध्ये प्रवेश मिळेल की नाही या शंकेमुळे त्याची इच्छा नसतानाही इतर महाविद्यालयांची नावे निवड यादीमध्ये लिहिली जातात. 


परिणामी दुसऱ्या फेरीत त्यांना नको असलेल्या महाविद्यालयाचा नंबर लागतो व आपणास कुठल्याच महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही अशा भितीपोटी विद्यार्थी व पालक घाई/ गडबडीत त्यांना नको असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची चूक करतात.अशा विद्यार्थ्यानी थोडासा संयम बाळगून दुसऱ्या फेरीत  मिळालेले महाविद्यालय ‘Not Freeze’ पर्याय वापरून तिसऱ्या फेरीस पात्र व्हावे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कचरे यांनी दिली. अधिक माहिती देताना डॉ. कचरे पुढे म्हणाले की, ‘तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची शक्यता वाढण्याचे कारण की, तिसऱ्या फेरीत सर्व आरक्षित जागा सर्वांसाठी खुल्या केल्या जातात. त्यामुळे स्वेरीतील सर्व आरक्षित जागा आपणासाठी खुल्या होतात. तसेच आपणास दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेल्या महाविद्यालयांची योग्यता तपासण्यासाठी खालील निकष वापरू शकता. एन.बी.ए.चे मानांकन जे की, महाराष्ट्रातील फक्त १० टक्के हुन कमी महाविद्यालयालाच प्राप्त आहे, उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद, (पीएचडी प्राप्त), प्रथम वर्षाचा निकाल, उत्तम नोकरीच्या संधी देणारे महाविद्यालय, संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा व पोषक वातावरण, शिकवणी मुक्त वातावरण, रॅगींग मुक्त व सुरक्षित परिसर आणि वसतिगृहे, महाविद्यालयातील मागील काही वर्षाचा प्रवेशाचा आलेख पहावा. बऱ्याचदा पालक ‘कमी फी’ किंवा ‘फी माफ’होत आहे हे पाहून महाविद्यालय निवडताना वर नमूद केलेल्या गुणवत्ता निकषांकडे कानडोळा करतात. बरीचशी महाविद्यालये मागील काही वर्षात प्रवेश होत नसल्याने व अनुषंगाने अर्थकारण ढासळल्याने वरील गुणवत्ता निकषांमध्ये तडजोड करताना दिसतात. अशा महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर एक तर नाराज होवून शिक्षण पूर्ण करत नाही किंवा कसे बसे पूर्ण करून बऱ्याच नोकरीच्या संधीपासून वंचित राहतो. तरी आपण दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेले पण नको असलेल्या महाविद्यालयांची जागा ‘Not Freeze’ करून तिसऱ्या फेरीसाठी पात्र होवून ‘स्वेरी’चा पर्याय तिसऱ्या फेरीत टाकावा व ‘स्वेरी’मध्ये प्रवेश घेवून उज्वल भविष्याची खात्री घ्यावी.’ असे आवाहन प्रवेश अधिष्ठाता डॉ. कचरे यांने केले आहे.
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages