लाभार्थी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 19 July 2019

लाभार्थी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड




 पंढरपूर, दि. 18 :- - शासनाच्या कृषि विभागामार्फत उन्नत शेती  समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत लाभार्थी शेतक-यांची सोडत पध्दतीने रोजी निवड करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी  राजेंद्र पवार यांनी दिली.
उन्नत शेती  समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत सन 2019-20 साठी  दिनांक 01 जून ते 20 जून 2019  या कालावधीत औजारे व ट्रॅक्टरसाठी  ऑनलाईनव्दारे  मागविण्यात आले होते.  त्यामध्ये ट्रॅक्टर व पॉवर टिलरसाठी 4 हजार 528 अर्ज तर औजारेसाठी 2 हजार 939 अर्ज असे एकूण 7 हजार 467 अर्ज प्राप्त झाले आहेत.


औजारासाठी लाभार्थी शेतक-यांची  सोडत  दिनांक 22 जुलै 2019 रोजी तर ट्रॅक्टर व पॉवर टिलरसाठी योजनेची सोडत दिनांक 23 जुलै 2019  रोजी  होणार आहे. ही सोडत सकाळी 10.00 वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय पंढरपूर, येथील आत्मा सभागृहात होणार आहे. ही सोडत प्रवर्ग निहाय घेण्यात येणार असून,या सोडतीस संबधित शेतक-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी राजेंद्र पवार यांनी केले आहे.
















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages