खरसुंडी ग्रामपंचायतीच्या मासीक मिटींगमध्ये बसण्यासाठी शफीक तांबोळीना सशर्त परवानगी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 22 July 2019

खरसुंडी ग्रामपंचायतीच्या मासीक मिटींगमध्ये बसण्यासाठी शफीक तांबोळीना सशर्त परवानगी

                           
   खरसुंडी दि .१९ ( वार्ताहर ) खरसुंडीतील माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पदवीधर मतदार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शफीक नुरमहंमद तांबोळी यांना खरसुंडी ग्रामपंचायत मासीक मिटींगमध्ये बसण्यासाठी सशर्त परवानगी दिल्याचे पत्र सरपंच , ग्रामविकास अधिकारी यांनी दिले आहे . ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून मासीक मिटींगमध्ये गावच्या कोणत्याही नागरीकाला बसता येवू शकेल .मात्र मिटींगमध्ये बसणाऱ्या नागरीकाने लेखी परवानगी घेऊन मासीक मिटींगमध्ये फक्त निरीक्षण करायचे आहे .  या मिटींगमध्ये हस्तक्षेप करण्यास , सुचविण्यास मात्र मनाई आहे . अशी तरतुद  असल्याचे शफीक तांबोळी यांनी खरसुंडी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले होते .                                    

शफीक तांबोळी यांनी यापूर्वी अनेकदा माहीती मिळविण्याच्या कायदयाच्या अधिकाराचा वापर करून अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत , अद्याप काही प्रकरणांबाबत तांबोळी यांच्या कडून विविध शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरूच आहे . तांबोळी यांच्यामुळे खरसुंडी तील भ्रष्टाचाराची , शासकीय जागा हडपण्याच्या प्रकाराची , अतिक्रमणांची माहिती उजेडात आल्याने पूर्वीचे कर्मचारी , अधिकारी , पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वाढीस लागली आहे .                   


  ग्रामपंचायत मासीक मिटींगमध्ये एखादया गोपनीय विषयावर चर्चा करायची असल्यास सभा अध्यक्ष त्यांना मिटींग मध्ये बसण्यास नकार देतील असेही या पत्रात ग्रांपच्या पदाधीकाऱ्यांनी नमूद केले आहे . तथापि काही अटी घालून मासीक मिटींगमध्ये शफीक तांबोळी यांना परवानगी दिली गेल्याने लोकशाही व्यवस्थेचा आणि नागरीकांचा हा मोठा विजय आहे . शफीक तांबोळी यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आणि मिटींगमध्ये बसण्याची परवानगी मिळविल्याचे पार्श्वभूमीवर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages