नागपूरमध्ये स्वेरीला ‘इन्स्पिरेशन आयडॉल’ने केले सन्मानित - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 27 July 2019

नागपूरमध्ये स्वेरीला ‘इन्स्पिरेशन आयडॉल’ने केले सन्मानित

                                       


 पंढरपूर- 'स्वेरीच्या रूपाने पालकांमध्ये विश्वास आणि प्रेमाची भावना निर्माण झाली असून स्वेरीतील संशोधनाचे वातावरण भविष्यात भारताच्या प्रगतीला हातभार लावणारे आहे. शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीत स्वेरीने घेतलेली ही झेप लक्षवेधी असून एकूणच बियाण्यांचे आता वटवृक्षांत रूपांतर झाले आहे.’ असे प्रतिपादन प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौड़वाल यांनी केले. नागपूरमधील वसंतराव देशपांडे नाट्यगृहात पार पडलेल्या भव्य दिव्य ‘प्राइड ऑफ़ प्लॅनेट २०१९’ या पुरस्कार प्रदान सोहळ्यात पद्मश्री अनुराधा पौड़वाल ह्या स्वेरीच्या पुरुस्काराबद्धल गौरव करत होत्या. प्रारंभी महापौर नंदा जिचकर आणि डॉ. विक्रमसिंह पाचलोरे यांनी प्रेरणा फेस्टिवलची दीपप्रज्वलानाने व विश्वशांतीच्या प्रार्थनेने  सुरुवात केली. डॉ. पाचलोरे फाउंडेशन तर्फे स्वेरीला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्धल ‘इन्स्पिरेशन आयडॉल’ पुरस्कार घोषित केला. हा पुरस्कार प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौड़वाल यांच्या हस्ते स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी.  नाडगौडा यांनी स्विकारला. डॉ पाचलोरे फाउंडेशनचे डायरेक्टर मैस्ट्रो डॉविक्रमसिंह पाचलोरे यांनी आपल्या भाषणातून स्वेरीच्या वाटचालीबाबत गौरवोदगार काढले. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, 'आम्ही जुनी शिक्षण प्रणाली बदलण्याच्या दृष्टीकोनातून आणि नवीन क्षितिजापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने प्रेरित झालो. बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेच्या भांडवलासह आम्ही शिक्षण क्षेत्रातील आदरणीय स्थान प्राप्त करू शकलो. दिलेला पुरस्कार आम्हाला नवीन मार्ग शोधण्याकरिता प्रेरित करेल.’ स्वेरीचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा म्हणाले की, "शिक्षणाने समाजाची भरभराट होते. शैक्षणिक व्यवस्था सक्षम करायची आणि आधुनिक आवश्यकतांसह सुसंगततेची गरज आहे.’ यावेळी डॉ. प्रमोद पडोले (डायरेक्टर- व्हीएनआयटी, नागपूर), डॉ. लोकेंद्रसिंह (संचालक - सीआयएमएस), श्रीमती सुनालिनी शर्मा, माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गावई, यांच्यासह डॉ. भावे, डॉ. लुँगे, डॉ. रानडे, डॉ. पाटील, विदर्भातील आय एम ए सदस्य, प्राध्यापक एम. टी. देशमुख, श्री. तुली, श्री. दर्डा, एम.आर. जयस्वाल आणि इतर. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे एन. व्ही. शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages