कुंकू बुक्क्याची उधळण करीत महाव्दार काला साजरा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 17 July 2019

कुंकू बुक्क्याची उधळण करीत महाव्दार काला साजरा



 छायाचित्रं सौजन्य:- निखील कडलाख

पंढरपूर, दि.१७- कुंकू बुक्क्यासह लाह्याची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाव्दार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दही हांडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. दरम्यान या काल्याने आता आषाढी यात्रेची सांगता झाली आहे.


पंढरीत अनेक संतांच्या विविध परंपरा असून यामध्ये महाव्दार काल्याचा देखील समावेश आहे. येथील हरिदास घराण्यात जवळपास चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्याची अख्यायिका आहे. तेव्हां पासून या घराण्यात या खडावा डोक्यावर घेवून काला करण्याची परंपरा आहे. या परंपरे नुसार आज दुपारी बारा वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज येथील काल्याच्या वाड्यात दिंडी घेवून आल्यावर हा उत्सव श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दाखल झाला. सभामंडप येथे काल्याचे मानकरी असणार्‍या ह.भ.प.मदन महाराज हरिदास यांना खांद्यावर घेवून पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. 



यानंतर अनिल महाराज हरिदास यांनी काल्याचा अभंग म्हणून दही हांडी फोडली व हांडीतील काला भाविकांना वाटला. मंदिरातून हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदीवर गेला येथे नदीचे पाणी पादुकांवर अर्पण करण्यात आले. यानंतर कुंभार घाट मार्गे माहेश्‍वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दही हांडी फोडून हा सोहळा काल्याच्या वाड्यात विसावला. येथे येणार्‍या हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. महाव्दार काल्यानंतर खर्‍या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाली आहे. या काल्यासाठी शेकडो वारकरी पंढरीत थांबतात.
पंढरपूरः श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात बुधवारी महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी शेकडो भाविक उपस्थितीत होते. 













-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages