स्वतः तयार केलेल्या प्रकल्पाचे ज्ञान नोकरीसाठी उपयुक्त ठरते - प्रा अविनाश लावणीस - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 25 July 2019

स्वतः तयार केलेल्या प्रकल्पाचे ज्ञान नोकरीसाठी उपयुक्त ठरते - प्रा अविनाश लावणीस



पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून प्रकल्प तयार करण्यासाठी म स्वतःहून भाग घेतला पाहिजे. स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर प्रकल्प तयार केला पाहिजे. या प्रकल्पा च्या माध्यमातून तुम्हाला प्लेसमेंट साठी आवश्यक असलेले ज्ञान मिळते. या ज्ञाना मधून तुमची जडणघडण होत असते, हे ज्ञान तुम्हाला कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून स्वतः तयार केलेले प्रकल्प हे उपयुक्त ठरतात आणि हे  प्रकल्प तयार करीत असताना विद्यार्थ्यांना आले ज्ञान हे त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी खुप उपयुक्त ठरते. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या अनेक संधी असुन त्यासाठी आवश्यक बहुमोल मार्गदर्शन केले. नामांकित कंपन्यात नोकरी व सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगली नोकरी मिळविण्यासाठी स्वतःचे कौशल्य प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्ध करून ज्ञान आत्मसात केले पाहिजे. हेच ज्ञान नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते. असे मत प्रा. अविनाश लावणीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यक्त केले आहे.



कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चरर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांच्या हस्ते प्राध्यापक अविनाश लावणीस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या गेस्ट लेक्चरसाठी बी. ई. मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. समीर कटेकर यांनी केले. 








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages