पुणे विभागातील 2 लाख 85 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांची माहिती

पुणे दि. 9: गेल्या चोवीस तासात पुणे विभागात महाबळेश्वर वगळता कोणत्याही धरणक्षेत्रात अतिवृष्टी न झाल्याने तसेच कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून 4 लाख 50 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने विभागातील पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी पातळी 2 फुटांनी कमी झाली असून सांगलीतील पाणी
पतळी 3 इंचांनी कमी झाली आहे. विभागातील 2 लाख 85 हजार 261 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थानांतर करून त्यांची 480 शिबीरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि सांगलवाडी येथे पूरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जेवणाची पाकीटे व पाणी पुरविण्यात आले असून हेलिकॉप्टरव्दारे त्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

जिल्हा नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 
 जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 
 सांगली 0233-2600500 श्री रफिक नदाफ 9096707339
कोल्हापूर 0231-2652953/2652950 श्री संकपाळ 9823324032
सातारा 02162-232175/232349 श्री देविदास ताम्हाणे 9657521122
पुणे 020-26123371 श्री विठठल बनोटे 8975232955
सोलापूर 0217-2731012 श्री बडे 9665304124
विभागीय नियंत्रण कक्ष पुणे 020-26360534 
श्री एस एस भोंग 9730701205

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


पुणे विभागातील पूरस्थितीसह बचाव व मदत कार्याची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते. डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात आतापर्यंत सरासरी 143 टक्के पाऊस झाला असून कोल्हापूर,
सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात येत्या 48 तासात हवामान विभागाच्यावतीने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर वगळता कोणत्याही धरण क्षेत्रात अतिवृष्टी झालेली नाही. त्यामुळे कोयना धरणासह इतर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून 4 लाख 50 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र येरळा नदीच्या क्षेत्रात पाऊस पडल्याने या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून कृष्णेसह इतर नद्यांच्या पण्यामुळे अलमट्टी धरणात 3 लाख 80 हजार क्युसेक इतका पाण्याची आवक होत आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास पाणी ओसरायला सुरुवात होणार आहे.

_________________________________________________


_________________________________________________

शासनाकडून पुणे विभागासाठी 76 कोटींचे अनुदान आले असून त्यामधून पूरबाधित शहरी कुटुंबांना 15 हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबांना 10 हजारांची मदत देण्यात येणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 
पुणे विभागातील पूरपरिस्थिती व उपाय (दिनांक 9.8.2019 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत) 
पर्जन्यमान- 
पुणे विभागात आज अखेर सरासरी 802.88 मि.मी, 143.49 टक्‍के  पाऊस झाला असून 
सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 223.4 टक्के झाला आहे. 
सातारा जिल्ह्यात 181.14 टक्के ,पुणे जिल्ह्यात 167.87 टक्के, 
कोल्हापूर जिल्ह्यात 124.74 टक्के तर तसेच 
सोलापूर जिल्ह्यात 77.57 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 
पुणे विभागात 58 पैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. 
पुणे विभागातील एकुण 58 तालुक्यापैकी 9 तालुक्यामध्ये अतिवृष्टी:  कोल्हापूर--कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा,शाहूवाडी,राधानगरी,गगनबावडा,गडहिंग्लज, भूदरगड, आजरा व चंदगड या 8 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
सातारा - सातारा जिल्ह्यात फक्त महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
धरणातील पाणीसाठा- पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हयातील सर्व धरणे 100 % भरली आहेत. पुणे विभागातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत आहे.


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________

पुणे विभागातील 2 लाख 85 हजार 261 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले_________________________________________________

सांगली जिल्ह्यातील ब्राम्हणाळ (ता.पलूस) येथील झालेल्या बोट दुर्घटनेत 7 महिला, 1 पुरूष व 1 लहान मुल असे एकुण 9 व्यक्ती मृत पावले आहेत. अजूनही 9 व्यक्ती बेपत्ता आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून, 1 व्यक्ती अंगावर झाड पडून व 1 व्यक्ती अंगावर भिंत पडून मयत झाली आहेत.
मदत व बचाव कार्य- सांगली जिल्हा

एनडीआरएफ - सांगली- जिल्ह्यात १५ एनडीआरएफ पथके (३५२ जवान व ५२ बोटी) पोहोचली आहेत. टेरिटोअरी आर्मी - सांगली मध्ये 1 पथक (54 जवान व 2 बोटी) कार्यरत आहेत. नेव्ही- सांगली जिल्हयामध्ये २पथके (३० जवान व १० बोटी) पथक पोहोचले आहे. 
जिल्हा प्रशासन :- 11 पथके (54 कर्मचारी व 12 बोटी) कार्यरत असून या व्यतीरिक्त सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून 20 बोटी सांगलीकरिता रवाना झाल्या आहेत. एसडीआरएफ - २ पथक (५९ जवान व ८ बोटी ) कार्यरत आहेत.
कोस्टगार्ड :-1 पथक, (20 जवान 1 बोट ) 
कोल्हापूर जिल्हा एनडीआरएफ - कोल्हापूर जिल्हयामध्ये 7 पथके (142 जवान व 21 बोटी ) पोहोचली आहेत. टेरिटोअरी आर्मी - कोल्हापूर मध्ये 4 पथके (106 जवान व 4 बोटी ) कार्यरत आहेत. नेव्ही -कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 पथके (76 जवान व 17 बोटी) पोहोचले आहे.
जिल्हा प्रशासन :- 21 पथके (90 कर्मचारी व 14 बोटी) एसडीआरएफ:-1 पथक (28 जवान व 2 बोटी ) कार्यरत आहेत. एनजीओ :- 1 पथक (10 जवान व 2 बोटी) कार्यरत आहेत.
 सातारा
एनडीआरएफ- सातारा जिल्हयामध्ये 1 पथके (22 जवान) पोहोचली आहेत.
एनजीओ :- 3 संस्था कार्यरत आहेत.
अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 48 पथके (452 जवान /कर्मचारी व 60 बोटी), सांगली जिल्हयामध्ये एकुण 32
पथके (५६९ जवान /कर्मचारी व ८५ बोटी) कार्यरत आहेत.


पुरग्रस्तांना मदत - विविध संस्था, रोटरी क्लब मुंबई, क्रेडाई पुणे, राजेंद्र मराठे मित्र परिवार, वखार महामंडळ, संचिद्र प्रतापसिंह, लायन्स क्लब पुणे, विठ्ठल पेट्रोलियम, सुंदर राठी यांच्या मार्फत 63 हजार 500 बिस्कीट पाकीटे पुरग्रस्तांसाठी जमा केली असून 8 हजार 500 पाकीटे सांगलीसाठी पाठविण्यात आली आहेत. भारतीय जनसंविधान मंच कोल्हापूर कॉलींग या संस्थेमार्फत 4000 बिस्किट पाकिटांचा कोल्हापूरमध्ये पुरवठा केला
असून कोल्हापूर शहरामधील कॅम्पमध्ये या संस्थेमार्फत 2 वेळेचे जेवण दिले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ डेअरीमार्फत 24 तास मोफत दुधपुरवठा करण्यात येत आहे. येथे कोणीही येवून दुध घेऊन जाऊ शकतात. तसेच सांगली व कोल्हापूर जिल्हयातील सर्व हॉस्पीटल हे रुग्णांना मोफत सेवा पुरवित आहे. पुणे विभागातील 77 हजार 524 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत पुणे विभागातील 10 हजार 812 ट्रान्सफार्मर बाधीत असून त्यामुळे एकुण 3 लाख 93 हजार 227 वीज ग्राहक बाधीत झाले आहेत. तथापी पूर्वी बंद असल्यापैकी एकुण 77 हजार 524 ग्राहकांचा बंद केलेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात आला आहे.कोल्हापूर मनपा मार्फत 26 पुनर्वसन ठिकाणापैकी 17 ठिकाणी विद्युतपुरवठा सुरू आहे व 9 ठिकाणी जनरेटर आवश्यक असून विदयुत पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कोल्हापूर येथे अतिरिक्त मनुष्यबळासाठी सातारा 8 पथके,बारामती 4 पथके व पुणे 3 पथके तैनात ठेवण्यात आलेली आहेत. पाणी कमी होताच कोल्हापूर येथे विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रवाना करण्यात येतील. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत केलेला असून पूरस्थिती कमी होताच तात्काळ सुरु करण्यात येत असल्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार व सांगली जिल्ह्यातील 99 हजार वीज ग्राहकांना महावितरण तर्फे एस.एम.एस.द्वारे कळविण्यात आले आहे. कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक 7875769103 हा असून सांगली जिल्ह्यासाठी 7875769449 आहे. स्थानांतरित केलेल्या मदत कॅम्पमध्ये वीज पुरवठा देण्यासाठी विद्युत जनरेटरची सोय
करण्यात आली आहे. वैदयकीय पथके – सांगली जिल्ह्यासाठी 72, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 150 व सातारा जिल्ह्यासाठी 72 अशी एकूण 201 पथके कार्यरत आहेत. अन्न धान्य वितरण – शासनाने अतिवृष्टी पुरामुळे बाधीत कुटूंबाना अन्न धान्य वितरीत करणेसाठी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रति कुटूंब 10 किलो गहू व 10 किलो तांदुळ मोफत पुरविण्यात येणार असून त्याचे नियोजनही करण्यात
आले आहे. सद्यस्थितीत मदत कॅम्पमधील स्थलांतरीत व्यक्तींना शिजवलेले अन्न, पाणी व इतर जीवनावश्यक साहित्यही
पोहोचविण्यात येत आहे.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com