महात्मा गांधी हे भारताच्या राजकारणातील आदर्श होत – प्राचार्य डॉ. विजय नलावडे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 10 August 2019

महात्मा गांधी हे भारताच्या राजकारणातील आदर्श होत – प्राचार्य डॉ. विजय नलावडे


पंढरपूर – “शस्त्राविना स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महात्मा गांधी यांचे कार्य जागतिक स्तरावर एकमेव आहे. ‘अहिंसा’, ‘सत्य’ व ‘सविनय कायदेभंग’ या तत्त्वांचा उपयोग करुन महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळ
लोकाभिमुख केली. महात्मा गांधींनी आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही. आपल्या मतावर ठाम राहून त्यांनी सत्याग्रह अवलंबिला. म्हणूनच महात्मा गांधी हे भारताच्या राजकारणातील आदर्श ठरतात.
भारतीय स्वातंत्र्य लढा प्रदीर्घ काळ लढण्याचे काम त्यांनी निष्टेने केले म्हणून ‘क्रांतिदिन’ हा आजरामर ठरतो.” असे प्रतिपादन थोर इतिहास अभ्यासक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय नलावडे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित ‘इतिहास मंडळ उदघाटन व ऑगस्ट क्रांतीदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे होते. प्राचार्य डॉ. विजय नलावडे पुढे म्हणाले की, “महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ १९२१ ला हातामध्ये घेतली. जोपर्यंत सामान्य माणसांचे सहभाग स्वातंत्र्यलढ्यात मिळू शकत नाही. तोपर्यंत हा स्वातंत्र्यलढा यशस्वी होवू शकत नाही. हे त्यांनी जाणले होते. १९४२ ते १९४७ या कालखंडात स्वातंत्र्याची चळवळ गतीमान करण्याचे काम गांधीजींनी केले. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु, डॉ. राजेंद्र प्रसाद या माणसांनी देशासाठी केलेला त्याग आपणास विसरता येणार नाही. 

_________________________________________________


_________________________________________________
गांधींजींच्या प्रेरणेने पश्चिम महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी उभारलेले प्रतिसरकार हे ग्रामराज्याचे आदर्श उदाहरण होय.” अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “स्वातंत्र्य कोणा एका व्यक्तीमुळे मिळाले नाही. सर्वांना या लढ्यामध्ये सामावून घेण्याचे कार्य गांधीजींनी केले. आपल्या कार्यावर प्रचंड निष्ठा व गाढ विश्वास यातून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य केले. क्रांतीकारकांनी केलेला संघर्ष व बलिदान आपणास विसरता येणार नाही. विद्यार्थ्यांनी या आदर्शातून प्रेरणा घेवून सामाजिक कार्य करावे.”

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. पी. शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. आर. एन. कांबळे यांनी करुन दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, प्रा. जयंत भंडारे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, सिनिअर विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. उमेश साळुंखे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages