सकारात्मक दृष्टीकोनोमुळे स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते – पोलीस निरीक्षक दयानंद गावडे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Tuesday, 13 August 2019

सकारात्मक दृष्टीकोनोमुळे स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते – पोलीस निरीक्षक दयानंद गावडेपंढरपूर – “प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास या तीन गोष्टींना विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाची जोड दिल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळविता येते. त्यासाठी कोणत्याही क्लासची आवश्यकता नाही. सोशल मिडियाचा वापर टाळून विद्यार्थ्यांनी संवाद केला पाहिजे. चांगल्या कामासाठी कोणत्याही क्षणी सुरुवात करता येते त्यासाठी विशिष्ठ मुहूर्त शोधण्याची आवश्यकता नसते. पळवाटा शोधणारी माणसे आयुष्यात कधीही यशस्वी होवू शकत नाहीत.” असे प्रतिपादन पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात आयोजित ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ व ‘करिअर गाईडन्स सेल’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, महाराष्ट्राचे महसूल व वनविभागाचे अवर सचिव आनंद माळी, श्रीमती डॉ. उगले, कला शाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. टी. एन. लोखंडे, प्रा. डॉ. विकास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
दयानंद गावडे पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून कर्तव्यावर प्रेम केले पाहिजे. आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सोशल मिडियाचा वापर विद्यार्थ्यांनी महिलांना सन्मान देण्यासाठी केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापराने घरातला संवाद नष्ट होत आहे. सोशल मिडियाच्या वापराने त्यात भर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरात सुसंवाद राखला पाहिजे.” आनंद माळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व उपलब्ध असणाऱ्या संधी याच्यामध्ये फार मोठी दरी असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येयनिश्चित करुनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला उतरले पाहिजे. स्पर्धा परीक्षेतील तंत्र समजून घेवून तयारी केल्यास निश्चित यश मिळते. त्यामुळे केवळ घोकंमपट्टीवर भर देवू नये. पायाभूत अभ्यास करण्यासाठी इयत्ता ५ वी ते १०वी साठी नेमलेल्या अभ्यासक्रमाची संपूर्ण तयारी करावी. प्रबळ इच्छाशक्ती व अभ्यासातील सातत्य याबाबी यश संपादन करुन देतात. ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेबद्दल न्यूनगंड न बाळगता अभ्यास करावा.”

_________________________________________________


_________________________________________________

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “सकारात्मक
माणसाला जगातले कोणतेही विष मारु शकत नाही तर नकारात्मक माणसाला कोणतेही औषध जगवू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कठोर परिश्रम केल्यास यश संपादन करता येते. महाविद्यालयातील शिक्षक व ग्रंथालयातील पुस्तके ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची मार्गदर्शन केंद्रे आहेत. याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ.
बी. एस. नाईकनवरे यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर विभागातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. यू. ए. साळुंखे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार करिअर गाईडन्स सेलचे प्रमुख प्रा. एम. के. गजधने यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Ad