दुष्काळी भागात सायपनने पुराचे पाणी येईपर्यत अलमट्टीची उंची वाढविण्यासाठी कानडी राजाला साकडे घालणार - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 5 August 2019

दुष्काळी भागात सायपनने पुराचे पाणी येईपर्यत अलमट्टीची उंची वाढविण्यासाठी कानडी राजाला साकडे घालणार


आटपाडी ( प्रतिनिधी ) अनेक वर्षापासून सतत मागणी केले जाणारे , कृष्णेच्या पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी पट्टयात राज्य सरकार देणार नसेल तर दुष्काळी पट्टयात सायपनने पुराचे पाणी येईपर्यत अलमट्टी धरणाची उंची मायबाप कर्नाटक सरकारने वाढवावी म्हणून दुष्काळग्रस्तांच्या वतीने आपण कानडी राजाकडे अशी उपरोधीक मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी सांगितले . गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात संततधार , कोसळधार , पुराचे संकट अशा प्रिंटमिडीया आणि इलेक्ट्रॉनीक्स मिडीयातील एकांगी बातम्यांमधून शेकडो दुष्काळी गावांवर अप्रत्यक्ष अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी सध्या पडत असलेला पाऊस जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पुरेसा झाला नसल्याचे सांगीतले .

___________________________________________


_________________________________________________________________________________

आजही दुष्काळी पट्टयातल्या शेकडो गावांना पुरेशा पावसाची गरज आहे . ही गावे पाण्यासाठी डोळयांत पाणी आणून वाट बघताहेत . हे चित्र दोन चार वर्षातले नसून पिढयान पिढयाचे आहे . स्वातंत्र्यपूर्वकाळात दुष्काळाने पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या अनेक पिढयां गारद केल्याच परंतू स्वातंत्र्यानंतरच्या सत्तरी पर्यत पाणी पाणी करणाऱ्या तीन पिढयांची वासलात लागली , शासनकर्त्याच्या अन्यायामुळे दुष्काळग्रस्तांच्या अनेक पिढयांचे पैशात मोजता येणार नाही इतके प्रचंड नुकसान झाले आहे . दुष्काळग्रस्तां साठीच्या  ताकारी , म्हैशाळ , टेंभू सारख्या योजनांनी प्रदिर्घ काळ रेंगाळत रेंगाळत पाणी पाणी करणाऱ्यांना अक्षरशः पाणी पाजले . 
__________________________________________________________________________________________हजारो कोटी गिळलेल्या या योजनांनी अद्यापही परिपूर्णतेची अंतिम कडा , रेषा गाठलेली नाही . वास्तवीक अनेक पिढयांची राखरांगोळी झालेल्या दुष्काळग्रस्तांना हे कृष्णेचे पाणी पुरेसे, वेळेत , आणि मोफत दिले जाणे गरजेचे होते आणि आहे . तथापी  पैसे भरणारांसाठीच पाणी अशा भूमिकेतून पळीतनं आमटी अन् सळीतनं भाकरी देण्याच्या सरकारी कंजुषीने दुष्काळी भागाची ससेहोलपट अद्यापही थांबलेली नाही . अनेक पिढयांच्या बरवादीची भरपाई म्हणून यापुढच्या किमान शंभर वर्षापर्यत दुष्काळग्रस्तांसाठी पिण्यासाठी , शेतीसाठी मोफत पाणी देण्याची भूमिका शासनकर्त्यानी घेतली पाहीजे . 

_________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

अलमट्टीची उंची वाढविण्याच्या उपरोधीक मागणी मुळे पुराच्या पाण्याचा त्रास होणारे सधन भागातले लाखो बांधव दुष्काळग्रस्तांसाठीचा मोठा आवाज बनतील हीच निखळ अपेक्षा या उपरोधीक मागणी मागे असून पुरग्रस्तांवर अन्याय करण्यासाठी अजिबात नसल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .नदीकाठचा परिसर आणि पाणलोट क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाहून चाललेल्या कृष्णेतील जास्तीच्या पाण्याने दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव तातडीने भरून घेतले पाहीजेत  यासाठी शासनाने युद्धपातळीवरून यंत्रणा राबवावी . .
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

सांगली , सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यांना सप्टेंबर नंतरच्या परतीच्या पावसावरच नेहमी निर्भर रहावे लागते . क्वचित प्रसंगी पाच दहा वर्षातून एकदा जुन, जुलैच्या  शाश्वत पावसाचा या दुष्काळी पट्टयाला लाभ होतो. मागच्या काही वर्षात दुष्काळी तालुक्यातील अनेक तलाव कृष्णेच्या पाण्याने भरले गेले होते . कॅनॉल ,ओढे , नाले, ओघळी द्वारेच्या या पाण्याच्या प्रवासातून भरल्या गेलेल्या तलावांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ ही झाला होता या वस्तूस्थितीकडे सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले . 
________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________

सध्या सुरू असलेल्या पावसाने कृष्णा आणि तिच्या उपनदया भरभरून वहात आहेत . हे जास्तीचे पाणी न अडविल्यास अथवा न उचलल्यास ते समुद्राचा रस्ता धरणार आहे . सदरचे पाणी तातडीने उचलून विविध योजनांद्वारे दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्यावेत . त्यामुळे दुष्काळी तालुके पाण्याच्या दृष्टीने आश्वस्त होतील . दुष्काळ पडल्यावर अथवा पाणीटंचाई निर्माण झाल्यावर करोडो रुपये टँकर , बोअर , इतर तकलादू उपायांवर खर्चणाऱ्या शासनाने वाहुन चाललेल्या पाण्यावर खर्च केल्यास टंचाई , टॅंकर , आणि छावण्या मधल्या भ्रष्टाचार आणि अमर्याद खर्चावर आपोआप निर्बंध येईल . त्याद्दष्टीने तातडीने यंत्रणा हलवून सदरचे वाहून जाणाऱ्या पाण्याने दुष्काळी तालुक्यातील तलावांना , लाखो शेतकऱ्यांना संजिवनी देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधीनी शासनास भाग पाडावे असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे 
________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages