भीमा खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात... कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 7 August 2019

भीमा खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात... कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरØ  कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
Ø  बचाव कार्यासाठी एनडीआरएफटेरिटोरियल आर्मीची पथके तैनात
Ø  अलमट्टी धरणाच्या प्रशासनाशी समन्वय
Ø  पुणे-बेंगळूरु महामार्गावर तीन ठिकाणी पाणी
Ø  कोल्हापूर जिल्ह्याचा रस्तेमार्गाचा संपर्क तुटला

पुणे दि. 7 : पुणे विभागातील कृष्णा आणि भीमा खोऱ्यापैकी भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कृष्णा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचा जोर अद्यापी कायम आहे.  सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने पूरस्थिती नियंत्रणात येईल. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदत कार्यावर प्रशासनाने भर दिला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. पुणे विभागातील पूरस्थिती आणि बचाव कार्याची माहिती देण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पुणे विभागात सरासरीच्या 137 टक्के पाऊस झाला आहे. विभागातील प्रमुख कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून भीमा खोऱ्यातील पावासाचा जोर कमी झाल्यामुळे या भागातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. मात्र या खोऱ्यातील उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशीरज, मंगळवेढा तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये पंढरपूर शहरातील अडीच हजारहून अधिक नागरिकांचा समावेश आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

1 लाख 32 हजार 360 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 136 गावे पूरामुळे बाधीत झाली असून जिल्ह्यातून 51 हजार 785 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  सातारा जिल्ह्यातील 6 गावे पूरामुळे बाधीत झालीअसून 6 हजार 262 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  सांगली जिल्ह्यातील 18 गावे पुरामुळे बाधीत झालीअसून 53हजार 281 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  7 हजार 749 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील 13 हजार 336 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  पूरामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू असून सर्वच लोकांना बोटीने हलविणे शक्य नसल्याने महिला, गरोदर महिला, वृध्द, रुग्णांना पहिल्यांदा हलविण्यात येत आहे, तर उर्वरित लोकांना गावातील उंच ठिकाणी नेण्यात येत आहे. स्थलांतरीत केलेल्या लोकांना तयार शिजवलेले अन्न पोहोचविण्यात येत आहे. त्याच बरोबर रॉकेल आणि मेणबत्ती व इतर जीवनाश्यक साहित्यही पोहोचविण्यात येत आहे.
पाणी पुरवठा योजनांना फटका
पूर स्थितीचा फटका विभागातील पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याच्या योजनांना बसला असून कोल्हापूर जिल्ह्यातील 390 गावातील, सांगली जिल्ह्यातील 113 गावातील, सातारा जिल्ह्यातील 91 गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी वीज पुरवठा नसल्याने तर काही ठिकाणी पाणी पुरवठा योजनांच्या मोटारी पाण्यात गेल्याने या योजना बंद पडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विभागातील 1 लाख 562 ट्रान्सफॉर्मर पैकी 10 हजार 882 ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत. यामध्ये काही पूराच्या पाण्याने बाधीत झाले असून यामुळे अंदाजे 2 लाख 756 वीज वितरण कंपनीचे ग्राहक बाधीत झाले आहेत.  


_________________________________________________


_________________________________________________

नियंत्रण कक्ष सज्ज
विभागात जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेचपाटबंधारे विभागमहानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे आपत्कालीन साहित्यबोटीलाईफ जॅकेटस्,लाईफ बॉयज्‌फ्लोटिंग पंपमेगा फोनबी. ए. सेटसेफ्टी हेल्मेटस्‌टॉर्च इत्यादि साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. पुरेशा औषध साठ्याबाबत तसेच साथीचे रोग पसरू नयेयासाठी खबरदारी घेण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नये
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नयेअफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच बचाव व पुनर्वसन कार्यात नागरिकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

संक्षिप्त माहिती (7.8.2019 दुपारी 2.00 अखेर )
पुणे विभागात आज अखेर सरासरी 751 मि.मी, 137 टक्‍के  पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 213 टक्के झाला आहेपुणे जिल्ह्यात 166 टक्केकोल्हापूर जिल्ह्यात 116 टक्के तर सातारा जिल्ह्यात173  टक्के तसेच सोलापूर जिल्ह्यात 78 टक्के पावसाची नोंद झाली आहेपुणे विभागात 58 पैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________


पुणे विभागातील पूर परिस्थिती बाबतची माहिती

1.      पुणे :-   मावळ ,मुळशीभोर ,वेल्हाजुन्नर ,आंबेगावशिरुरखेड या 8 तालुक्यात अतिवृष्टी.
2.      सातारा :-  साताराकराडपाटणवाई या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .
3.      सांगली :- मिरजवाळवाशिराळापलूस या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .
4.      कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.

धरणातील पाणीसाठा

Ø  पुणेकोल्हापूरसातारा  सांगली जिल्हयातील सर्व धरणे 100 % भरली आहेत.
Ø  स्थानांतरांची माहितीपुणे विभागातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेबाबत सुचित करण्यात आले आहेदि.07/08/2019रोजी पर्यत.
स्थानांतरित केलेल्या कुटुंबांचा तपशिल

.क्र.
जिल्हा
स्थानांतरीत कुटुंबांचीसंख्या
स्थानांतरीत व्यक्तींची संख्या
1
2
3
4
1
पुणे
3343
13336
2
सातारा
1462
6262
3
सांगली
10282
53228
4
सोलापूर
1878
7749
5
कोल्हापूर
11432
51785
एकूण
28397
132360

पुलांची   रस्त्यांची स्थिती

·         पुणे :- पुणे जिल्हयातील धरणातुन होणारा पाण्याचा विसर्गामुळे ग्रामीण भागातील 103 मोठे पुल  433 छोटे पुल यापैकी 34 पुले पाण्याखाली गेले आहेतपुणे महानगर पालिका हद्दीतील 3 , पिंपरी चिंचवडमहानगरपालिका हद्दीतील 2, पुणे कॅन्टोलमेंट हद्दीतील -1 असे एकुण पुणे जिल्हयातील 40 पुल पाण्याखाली गेले आहे.
·         सातारा :- सातारा जिल्हयामध्ये 8 पूल पाण्याखाली गेले असून पर्याची मार्ग उपलब्ध आहेत.
·         सांगली :- सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 6 प्रमुख जिल्हामार्ग 15  इतर जिल्हा मार्ग 6 पाण्याखाली गेलेले आहेत.
·         कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयामध्ये 104 केटीवेअर 89 रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

पूर परिस्थितीमुळे जीवितहानी

.क्र.
जिल्हा
पुरामुळे मयत व्यक्तींची संख्या
1
2
3
1
पुणे
04
2
सातारा
07
3
सांगली
02
4
सोलापूर
01
5
कोल्हापूर
02
एकूण
16


_________________________________________________


मदत  पुनर्वसन.
·         पुणे विभागातील पुरांमुळे स्थानांतरीत झालेल्या व्यक्तींना महानगरपालिका शाळा , जिल्हा परिषद  इतर सार्वजनिक इमारतीमध्ये अशा ठिकाणी स्थानांतरित करण्यात आलेले आहे.
·         सांगली जिल्हयात जीवन ज्योत या संस्थेने ढवलीवाडी या गावातील 350 लोंकांच्या जेवणाच्या व्यवस्था केली आहे.
मदत  बचाव कार्य-
कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 एनडीआरएफ पथके पोहोचली असून आणखी 6 एनडीआरएफ पथके रवाना होत आहेत.  1 नौदल पथक पोहोचले आहे.
सांगली  जिल्हयामध्ये एनडीआरएफ पथके पोहोचली आहेतआणखी 3 एनडीआरएफ पथके रवाना होत आहेत.
सातारा जिल्हयामध्ये एनडीआरएफ पथके पोहोचले आहे. तसेच टेरीटोरिअल आर्मीची कोल्हापूर मध्ये 4  सांगलीमध्ये 1 पथके कार्यरत आहेत.
·         एनडीआरएफ  जिल्हा पातळीवरील जीवरक्षक बोटींचा वापर करण्यात येत आहे.
·         कोल्हापूर जिल्हयातील करवीर , हातकणंगले  शिरोळ या 3 तालुक्यामधील पुरामुळे 129 गांवे बाधित असून 11432 कुटूंब बाधित आहेतत्यापैकी 51785 व्यक्तींना तात्काळ हालविणे आवश्यक आहेकार्यवाही पूर्ण आहे.
·         कोल्हापूर जिल्हयातील कागल  गडहिंग्लज या तालुक्यातील रस्ते सुरु आहेतइतर सर्व रस्ते बंद आहेत.
·         कोल्हापूर जिल्हयात 3 एनडीआरएफ  पथक  टेरीटोरिअल आर्मी 2  पथक, 10 बोटी  140 जवान कार्यरत आहेत.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages