डॉ. बाबा आढाव यांचे मंगळवारपासून बेमुदत उपोषण - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 4 August 2019

डॉ. बाबा आढाव यांचे मंगळवारपासून बेमुदत उपोषण
                               सोलापूर जिल्ह्यातून होणार मोठे आंदोलन- शिवाजी शिंदे
पुणे येथे सोमवार दि. 29 जुलै पासून हमाल मापाडी यांचे पाठबंध आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास शासन दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन करून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे महामंडळाच्या बैठकीमध्ये ठरले असल्याचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांपासून तोलाईचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तोलारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्‍न येत्या सोमवारपर्यंत न सटल्यास मंगळवार दि. 6 ऑगस्ट पासून उपोषण करणार असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला आहे. हाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
दरम्यान शुक्रवारी दुपारी तोलार आणि हमाल बांधवांच्या शिष्टमंडळाने राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची भेट घेतली. यावेळी तौष्णीवाल यांनी हा प्रश्‍न मार्गी लावू असे आश्‍वासन महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील तोलाईच्या प्रश्‍नांवरून हमाल आणि तोलार तसेच व्यापारी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. बाजारात हमालांनी बंद केल्याने करोडो रूपयांचे व्यवहार थंडावले आहेत. तर दुसरीकडे तोलारांवर गेल्या सहा महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न आता चिघळला असून, याबाबत बाजारसमितीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे आता डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. हमाल मापाडी महामंडळाच्या बैठकीस औरंगाबाद, नगर, बीड, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, चिपळून येथून प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी सरचिटणीस सुभाष लोमटे, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, विकास मुकदुम, सहचिटणीस शिवाजी शिंदे, हनुमंत बहिरट, अविनाश घुले, कृष्णा चौगुले, गंगाधर कोळेकर, गोरख मेंगडे, नवनाथ बिनवडे, दत्ता डोंबाळे, कामगार युनियनचे संतोष नांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages