वाखरीत फुलतेय मोत्यांची अनोखी शेती.. शेतीपुरक व्यवसाय बळीराजासाठी फायद्याचा,प्रशिक्षणाचीही सोय ! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Tuesday, 13 August 2019

वाखरीत फुलतेय मोत्यांची अनोखी शेती.. शेतीपुरक व्यवसाय बळीराजासाठी फायद्याचा,प्रशिक्षणाचीही सोय !

         
 Pandharpur- (Report By-Prashant Waghmare)
 माझी शेती ,माझा प्रयोग
          सर्व संताच्या पदस्पर्शाने भक्तिचा मळा फुलविणार्या वाखरी गावात आज तितक्याच सुंदर मोत्यांची शेती फुलत आहे. शेतीमधील या शेतीपुरक अनोख्या प्रयोगाने शेतकऱ्यांना उत्पनाचा  एक नवीन मार्ग उपलब्ध होत आहे.
      पंढरपूरमधील कापडव्यापारी दिगंबर गडम शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतात.त्यांची वाखरी येथे शेती असून त्याची देखरेख ज्ञानेश्वर मदने करतात. गडम यांचे औरंगाबाद येथील  बंधू अभियंता श्रीपाद गडम व जावई अनिकेत निलावार यांनी मोत्यांच्या शेतीबद्दल दिगंबर यांना माहिती दिली. त्यांनी त्वरीत मोती बनविणार्या इंडोपर्ल कंपनीशी संपर्क करुन गडचिरोलीला संजय घंदाटे यांचेकडे दोन दिवसांचे प्रशिक्षण  घेतले.
         अरुण अंभोरे नावाच्या प्राथमिक शिक्षकाच्या इंडोपर्ल या कंपनीबरोबर शिंपले टाकणे, मोती बनविणे व कंपनीने ते विकत घेण्याचा करार करुन घेतला. वाखरी येथील गडम यांच्या शेतात मागेल त्याला शेततळे  या योजने अंतर्गत  शंभर बाय शंभर फुटाचे शेततळे तयार करुन घेतलेआणि त्यात शिंपले सोडून मोत्यांची शेती फुलविली.
       इंडोपर्ल कंपनी कडून भेटीच्या खर्चासह  शिंपले साधारणपणे  शंभर रुपयांना मिळते . एका शिंपल्यात एका वर्षात दोन मोती तयार होतात.एक मोती दोनशे पन्नास रुपयांना विकत घेण्याचा कंपनी करार करुन घेत असल्याचे दिगंबर गडम सांगतात.

वाखरी ( ता.पंढरपूर ) येथील मोत्यांच्या शेतीची पाहणी करताना पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटिल,सदस्य सत्यवान देवकुळे,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,कृषी विस्तारअधिकारी मधुकिरण डोरले,दिगंबर गडम, ज्ञानेश्वर मदने,सरपंच मथुराबाई मदने,नवनाथ मदने
    
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
आयुर्वेदासाठी,आभुषणासाठी व गोल मोती असे तीन प्रकारचे मोती बनविले जातात.त्यांचा कालावधीही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. शिंपला ज्यावेळी बँक्टेरिया खायला तोंड उघडतो त्यावेळी लहान वाळूचा कण आत जातो, त्यावरती शिंपला लाळ टाकतो वा तो नैसर्गिक मोती बनतो. कंपनी मात्र फार काळजीपूर्वक साच्यामध्ये देवदेवतांसहित वेगवेगळे आकार बनविते व शिंपले त्यावरती लाळ टाकून त्या आकारांचे मोती बनतात.यासाठी  एका वर्षाचा कालावधी लागतो.
      हे शिंपले जाळीत वेगवेगळे असे  दहाच्या संखेने सोडले जातात.शिंपले जेवढे खुश  तेवढे मोती चांगले बनतात म्हणून त्यामध्ये दोन मादी व आठ नर  सोडले जातात. पाण्यात पाच फुट खोलीवर असणारे शिंपले पाण्यातील बँक्टेरिया ,शेवाळ व नजरेसही न दिसणारे किटाणू खातात.काहीवेळीच बाहेरुन शेवाळ शेततळ्यात सोडावे लागते.एक शिंपला एका तासाला साधारण पाऊने दोन लीटर पाणी फिल्टर करत असल्याने  शेतीसाठी फिल्टर पाणीही मिळते.
       _________________________________________________


_________________________________________________
यामध्ये साधारण तीस टक्के मर असते.त्याचा विमा उतरविल्याने त्याचे ऐंशी रुपये प्रमाणे पैसे परत मिळतात.परंतू दिगंबर गडम यांचे शेतात फक्त पाचच टक्के मर असल्याचे ते सांगतात.कंपनी सुरवातीस शंभर टक्के रक्कम चेकने घेते.दर दोन महिन्यास कंपनीच्या लोकांना पाहणीस बोलवावे लागते.
        10/10/7उंची असणार्या जागेत एक हजार शिंपले सोडता येतात.साधारण 10 ब्रास मध्ये एक लाख खर्चामध्ये चार लाखाचे उत्पन्न मिळते.त्यासाठी विशेष कोणतीही देखभाल करावी लागत नाही व इतर कोणताही खर्च नाही.अगदी घराच्या तिसर्या मजल्यावरही काही उद्योगपती मोत्यांची शेती करतात.
       पारंपारिक शेतीला पुरक व्यवसाय म्हणून मोत्यांची शेती करावी . आजपर्यंत एक हजार शेतकर्यांनी या मोत्यांच्या शेतीला भेट दिली असून दिगंबर गडम व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर मदने याबाबतचे प्रशिक्षण वाखरी येथे देणार असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी याचा लाभ घेण्याचे अवाहन सभापती राजेंद्र पाटिल यांनी केले आहे.
       दुष्काळ,पूर व अनेक अस्मानी संकटांना तोंड देत आपल्या शेतीमध्ये अनोखे प्रयोग करुन शेतीपुरक व्यवसाय उपलब्ध करुन देणार्या तरुण शेतकर्यांना सर्वांनी प्रोत्साहन देण्याची गरज असून इतरही शेतकर्यांनी त्याचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.जेणेकरुन भारत नक्कीच सुजमाल सुफलाम होईल. 


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Ad