महिलांच्या आर्थीक स्थैर्यासाठी संस्था उभारणार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 6 August 2019

महिलांच्या आर्थीक स्थैर्यासाठी संस्था उभारणारआटपाडी दि . ४ ( प्रतिनिधी )  महिलांची आर्थीक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रचनात्मक संस्थाची उभारणी करीत तालुक्यातील हजारो माता भगिनींच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी उर्वरीत आयूष्य मार्गी लावणार असल्याचे उदगार श्री . भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन , ज्येष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील यांनी येथे काढले . राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजारामबापू हायस्कूलच्या सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

अध्यक्षस्थानी श्रीमती छायाताई बरकडे आणि प्रमुख अतिथी म्हणून सौ . मंदाकिनी रावसाहेबकाका पाटील या उपस्थित होत्या .    आपल्या भाषणात रावसाहेबकाका पुढे म्हणाले , समाजातल्या विविध स्तरात आढळणाऱ्या माता भगिनीच आपआपल्या प्रपंचात मोठी भूमिका पार पाडतात , परंतू त्यांच्या हाताला काम देवून त्यांच्या जीवनात नवचैतन्य आणण्याचा यापूर्वी फारसा मोठा कोणी प्रयत्न केला नाही . या पुढच्या काळात त्यांच्यासाठीच वेगवेगळे मार्ग शोधत तालुक्यातील भगिनींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभी राहता यावे म्हणून यापूढे आपण कार्यरत राहणार आहोत .
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

 आटपाडी तालुक्यातल्या शेकडो बचत गट, संस्था , संघटनामध्ये विभागलेल्या हजारो माता भगिनींनी त्यांचे स्वतःचे संस्थात्मक एक मजबूत व्यासपीठ साकारावे असे स्पष्ट करून मुस्लीम खाटीक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष , राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य सादिक खाटीक यांनी कुटीरोद्योग , ग्रामउद्योग अशा छोटया , छोटया व्यवसायात कच्चा माल आणणे , उत्पादन बनविणे , आणि विक्री करणे या त्रिस्तरीय पध्दतीच्या अभ्यासासाठी सोलापूरचे माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्या संस्थेला आणि इस्लामपूर येथील लिज्जत पापड यूनिटला भेट देवून तेथील प्रकल्पांची इत्यंभूत माहिती घेतल्यास या भगिनींना नव व्यवसाय उद्योग उभारणीची दिशा सापडेल , त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे सादिक खाटीक यांनी सांगीतले . 
________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________

यावेळी खानापूर तालुक्याचे  दिनकरराव जाधव ( मेंगाणवाडी ) , राजारामबापू हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष सुरज पाटील , नितीन डांगे, युवराज बरकडे , सौ . शमशाद सलीम शेख , सौ . लक्ष्मी दत्तात्रय माने , अमित पाटील आदि उपस्थित होते . स्वागत , प्रास्तावीक यशवंत बरकडे यांनी करून आभार मानले .
________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add