सांगोला रेल्वेस्थानकाच्या समस्यांसंदर्भात शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन सादर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 27 August 2019

सांगोला रेल्वेस्थानकाच्या समस्यांसंदर्भात शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन सादरसांगोला(प्रतिनिधी)- येथील रेल्वेस्थानकाच्या समस्यांसंदर्भात रेल्वे विभागीय व्यवस्थापक सोलापूर यांना विविध मागण्यांचे निवेदन शहीद अशोक कामटे सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने महूद रेल्वे गेट परिसरात मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्या ठिकाणी तळ्याचे स्वरूप प्राप्त होते व वाहनधारकांना मोठा त्रास होतो.

 या साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सांगोला रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटर ची सोय नसल्यामुळे एक्सप्रेस रेल्वे आल्यानंतर कोणता डबा कोणत्या ठिकाणी थांबणार आहे ? हे समजत असल्यामुळे प्रवाशांची धावपळ होते. तेव्हा तोच इंडिकेटर तात्काळ बसवावेत अशीही मागणी केली असून स्टेशनबाहेर रस्त्या लगत दोन मोठ्या कमानी असून त्यावर कसलाही उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरील प्रवाशांना रेल्वे स्टेशन नेमके कोठे आहे?  हे समजून येत नाही.

 
तेव्हा "सांगोला रेल्वे स्टेशन" असा फलक या कमानीवर लावण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. तर स्टेशन आवारात काटेरी झाडे वाढली असून ती काढून स्वच्छता करणे गरजेचे असून रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी आर. पी.एफ. पोलीस जी. आर.पी. एफ. पोलीस नेमावेत त्याचबरोबर आरक्षण खिडकीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष संतोष महिमकर यांनी नुकतेच दिले आहे. या निवेदनाच्या प्रती रेल्वेमंत्री पियुष गोयल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही पाठवण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________


__________________________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add