स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात निवड-पोलीस फोर्सच्या असिस्टंट कमांडर प्रियांका भोसले - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 14 August 2019

स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात निवड-पोलीस फोर्सच्या असिस्टंट कमांडर प्रियांका भोसले


स्वेरीत स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन संपन्न
पंढरपूर-(संतोष हलकुडे) ‘आपली परिस्थिती कशीही असो परंतु परिस्थितीचा अधिक बाऊ करू नये. मनापासून एकच ध्येय ठरवून त्या दिशेने परिश्रमपूर्वक वाटचाल केल्यास अपेक्षित यश निश्चित मिळते. अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेत इतर विभागाच्या तुलनेत इंजिनिअरींगचे विद्यार्थी अधिक प्रमाणात उत्तीर्ण होत असल्याचे वास्तव आहे. स्पर्धा परीक्षा कोणत्याही भाषेत देता येत असली तरी अंतिम मुलाखत घेणारे परीक्षक हे इंग्रजी भाषिक असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक इंग्रजी भाषा अवगत करावी.’ असे प्रतिपादन सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्सच्या असिस्टंट कमांडर प्रियांका भोसले यांनी केले.
          स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा’तर्फे अभियांत्रिकी व फार्मसी विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी ‘स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी कशी घालायची ? याबाबत आयोजिलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात यु.पी. एस. सी. स्पर्धा परीक्षेच्या सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्सच्या परीक्षेत मुलींमध्ये भारतात प्रथम आलेल्या सरकोली (ता. पंढरपूर) येथील प्रियांका भोसले स्वेरीतील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करत होत्या. प्रारंभी स्वेरीच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. यशपाल खेडकर यांनी  संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी,. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षापासून  सुरु असलेल्या मार्गदर्शन केंद्राबात माहिती दिली. 
पुढे बोलताना पोलीस अधिकारी भोसले म्हणाल्या की, ‘कोणत्याही परिस्थितीत सहज स्पर्धा परीक्षा देता येते आणि त्यात यशस्वी होता येते. यासाठी साधारण दररोज आठ ते दहा तास गंभीरतेने अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी इंटरनेटचा वापर मात्र गरजेपुरताच आणि सकारात्मक करावा. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थी असा काही फरक नसतो. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ऐंशी टक्के विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवितात. यु.पी. एस. सी. असो अथवा एम.पी. एस. सी. परंतु यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना गंभीरता ही घ्यावीच लागते. भारतात दहा ते बारा लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात आणि अंतिम मुलाखतीत जवळपास सातशे जणांचीच निवड होते. स्पर्धा परीक्षेत इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र हे विषय महत्वाचे आहेत. त्यामुळे तयारी करताना सर्व विषयाबरोबरच या तीन विषयांचा अधिक सखोल अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेत प्रिलीयम, मेन्स आणि इंटरव्ह्यूव हे मुख्य तीन टप्प्यातून स्पर्धा होते. आपण इंटरव्ह्यूमध्ये चुकीची उत्तरे न देता आपला आत्मविश्वास किती आहे हे पाहण्यासाठी संदर्भ नसलेला प्रश्नही विचारू शकतात यासाठी गोंधळून न जाता सावकाश उत्तरे द्यावीत. परीक्षेची तयारी करताना यु ट्यूबवरील प्रेरणा देणारे विचार ऐकावेत, स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध असणारी पुस्तके यांचा वापर करावा. स्पर्धा परीक्षेत पूर्ण तयारी, बॉडी लँग्वेज, स्वभाव,आत्मविश्वास या बाबी महत्वाची भूमिका वठवितात. जर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर चुकीची उत्तरे मात्र देवू नका. यामुळे परीक्षक हे चूक अथवा बरोबर यापेक्षाही स्पर्धकाचा आत्मविश्वास कसा आहे? याची पाहणी करत असतात.’ 

से सांगून स्वेरीच्या शैक्षणिक प्रगतीने त्या भारावून गेल्या. त्या म्हणाल्या.’येथील शैक्षणिक प्रगती पाहता स्वेरीसारखे गुणवत्ता पूर्ण कॉलेज आपल्या परिसरात खूप कमी आहेत. या ठिकाणी आपण शिक्षण घेत आहात हे खूप लकी आहे.’ मी ग्रामीण भागातून आले असून भविष्यात स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’ यावेळी स्वप्नील रोपळकर, गावडे, दुर्गा बागल, अमर पडवळे, अभिजित पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्पर्धा परीक्षेसंबंधी भोसले यांना प्रश्न विचारुन माहिती जाणून घेतली. यावेळी मंत्रालयातील महसूल विभागचे मुख्य सचिव पितांबर भोसले, श्रीराम माने, रणजीत मोरे, किरण घोडके, सुहास तगारे तसेच विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, डॉ. भुवनेश्वरी, प्रा. दीप्ती तंबोळी, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग यांच्यासह अभियांत्रिकी, फार्मसी व एम. बी. ए. मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages