आजचे इंजिनिअर्स हे नोकऱ्या शोधणारे नव्हे तर संशोधनातून नोकऱ्या निर्माण करणारे असावेत - डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ एन. बी. पासलकर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 29 August 2019

आजचे इंजिनिअर्स हे नोकऱ्या शोधणारे नव्हे तर संशोधनातून नोकऱ्या निर्माण करणारे असावेत - डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ एन. बी. पासलकर



                                                                          स्वेरीमध्ये इनोवेशन कौन्सिलचे थाटात उदघाटन

    पंढरपूरकाळानुसार शिक्षण प्रक्रियेत बदल होणे अपेक्षित असते. रोजगाराच्या नवीन संधी या संशोधनातून निर्माण होत असतात. त्यामुळे आजचे इंजिनिअर्स हे नोकऱ्या शोधणारे नव्हे तर संशोधनातून नोकऱ्या निर्माण करणारे असावेत. असे प्रतिपादन डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांनी केले.

   विद्यार्थी व शिक्षकांतील संशोधन व नवनिर्मितीक्षम गुणांना चालना देण्याच्या व त्यायोगे उद्योजकता वाढविण्याच्या उद्देशाने आज स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इनोव्हेशन कौन्सीलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर हे विद्यार्थी व प्राध्यापकांना  मार्गदर्शन करत होते. दिप प्रज्वलनानंतर देशपांडे कन्सल्टिंग पुणेचे सुहास देशपांडे म्हणाले की, ‘आज सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण वरचेवर कमी होत आहे. त्यामुळे नवीन संशोधन व त्यामधून उद्योग निर्मिती या काळाच्या गरजा बनल्या आहेत.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

   त्यामुळे नवीन पिढीने संशोधनातून आपला विकास साधणे आवश्यक आहे.’ तसेच या उदघाटनाच्या निमित्ताने सुदर्शन नातूअशोक सराफ, अतुल मराठे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. डॉ. पासलकर पुढे म्हणाले की ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारच्या इनोवेशन कौन्सिल्स’ स्थापन करणे आवश्यक आहे. अशा इनोवेशन कौन्सिल्स मधून समाजोपयोगी संशोधन प्रकल्पांना चालना देणेप्रकल्पावर आधारित वस्तू व सेवा उपलब्ध करून देणेविद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या संशोधन कार्यास चालना देणेउत्पादनासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे इ. गोष्टीना गती मिळणार आहे.

   त्यामध्ये आर्टीफिशियल इंटेलिजन्समशीन लर्निंगब्लॉक चेन टेक्नोलॉजीबिग डेटा अनालिसिसआय.वो.टी.वर आधारित टेक्नोलॉजी इ.चा समावेश आहे.’ यावेळी अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रात जवळपास ३५ ते ४० किंवा त्याहूनही अधिक अनुभव असणारे व राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले अनेक मान्यवर डॉ.पद्माकर केळकररमेश अडवी व विवेक देशपांडे हे उपस्थित होते. तसेच स्वेरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इनोवेशन कौन्सिलच्या प्रमुख प्रा.डॉ.व्ही.एस.क्षीरसागर उपस्थित होत्या.

   सर्व मान्यवरांनी स्वेरीतील विद्यार्थी व प्राध्यापकांना त्यांच्या संशोधन कार्यात सदैव सक्रीय सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यातून स्वेरीच्या संशोधन कार्यास संस्थेचे संस्थापक सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अजून जास्त गती निर्माण होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पी.एम.पवार यांनी आभार मानले.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add