विदर्भ वैंनगंगेला पूर आल्याने सतर्कतेचा इशारा - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 10 September 2019

विदर्भ वैंनगंगेला पूर आल्याने सतर्कतेचा इशारा


भंडारा : मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आज कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरुन बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दोन मिटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हाधिकाºयांनी पुरस्थितीची पाहणी केली असून वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे._________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवराच्या खोºयातही जोरदार अतिवृष्टी होत असल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली होती. परंतु, पुन्हा अतिवृष्टी झाल्याने संजय सरोवराचे १० दरवाजे १.८५ मिटरने उघडण्यात आले. त्यातून ७५,४०० क्युसेक्स क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीला पूर आला आहे. वैनगंगेची धोक्याची पातळी २४५.०० मिटर आहे. आज ही पातळी २४५.३२ मीटरवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत. करचखेडा-सुरेवाडा, सिहोरा-बपेरा, तामसवाडी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर भंडारा शहरानजिकच्या ग्रामसेवक कॉलनीत पुराचे पाणी शिरले आहे. भंडारा येथील स्मशानभूमी मार्गावर पाणी असल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगेच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाल्याने पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे २ मिटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ४,८५,१९२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे._________________________________________________


_________________________________________________


संततधार पाऊस आणि धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना पूर आला आहे. या दोन नद्यांचा संगम बपेरा गावाच्या शेजारी आहे. आंतरराज्यीय पुलावर ५ फुट पाणी असल्याने महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला असून शेकडो प्रवासी सिमावर्ती गावात अडकले आहेत. पुराचे पाणी देवरी गावाचे शिवारात शिरल्याने १०० एकरहून अधिक क्षेत्रातील धानाचे पिक गेल्या ४८ तासापासून पाण्याखाली आहेत. गोंडीटोला, सुकडी नकुल, बपेरा, चुल्हाड, परसवाडा या नद्यांच्या काठावरील गावात हीच स्थिती आहे. बावनथडी नदीचे पाणी संगमनजिक अडल्याने नदीला पूर आला आहे. याच नदीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याला जोडणारा पूल आहे. या पुलावर ५ फुट पाणी आले आल्याने संपूर्ण वाहतूक बंद आहे.

_________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages