सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली प्रार्थना - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 7 September 2019

सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली प्रार्थना




       पुणे,दि.6 - सर्वांना जीवनात सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवोअशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गणरायाकडे केली.  सध्या सर्वत्र गणेशपर्व सुरू असून पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

   केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेगणेशोत्सवाच्या निमिताने श्री गणेशाचे दर्शन घेण्याकरीता आणि त्यासोबत लोकमान्यांना वंदन करण्यासाठी मला येथे येण्याची संधी मिळालीयाचा मला खरोखर आनंद आहे. गणेशोत्सवाची  ही  परंपरा लोकमान्य टिळकांनी उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली

   परिणामी त्यातूनच या उत्सवाला सामाजिक अभिसरणाचे स्वरुप प्राप्त झाले. तेच स्वरुप पुण्यामध्ये अनेक मंडळानी जतन केले आहे. सर्वांना  गणोशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणालेश्री गणेशाला प्रार्थना करतो कीआपल्या सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो व  श्री गणेशाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र देखील प्रगतीपथावर जात राहोअशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले .             

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

यावेळी महापौर मुक्ता टिळकखागिरीश बापटखा.संजय काकडेदिलीप कांबळे.भीमराव तापकीरमाधुरी मिसाळपुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

विविध मंडळांच्या गणपतींचे घेतले दर्शन

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मानाचा पहिला कसबा गणपती यांचे दर्शन घेवून आरती केलीयावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केलेत्यानंतर दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला भेट देवून दर्शन घेतले व आरती केलीयाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे व उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी त्यांचे स्वागत केलेयावेळी दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

            यानंतर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.  यावेळी अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी त्यांचे स्वागत केलेयाप्रसंगी मंडळाच्या व  सिध्देश्वर ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी रुपये 51 हजाराचा धनादेश देण्यात आलायानंतर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले
            

_________________________________________________


_________________________________________________

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी  महापौर मुक्ता टिळक व दैनिक केसरीचे संपादक दिपक टिळक यांनी  त्यांचे स्वागत केलेयावेळी मुख्यमंत्री सहायता निधीस दि जनता सहकारी बँक यांच्याकडून रुपये 21 लाख व उद्यम विकास बँक व चरणजीत सहाणी यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश दिला.

            यानंतर साने गुरुजी तरुण मंडळ येथील गणपतीचे दर्शन घेवून मंडळामार्फत उभारण्यात आलेल्या देखाव्याचे उद्घाटन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष धिरज घाटे यांनी त्यांचे स्वागत केलेयानंतर मुख्यमंत्री यांनी कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळ यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन  केले. तसेच गणपतीचे दर्शन घेऊन आरती केलीयावेळी मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages