डॉ. निता पाटील फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्यावतीने चार लोकाभिमुख उपक्रमांचे उदघाटन


टिटवाळा-  डॉ. निता पाटील फाऊंडेशनची सभा नुकतीच विद्यामंदीर शाळा,मांडा टिटवाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या सभेला कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, टिटवाळा आणि परिसरातील 75 व्यावसायिक मित्रांनी उपस्थिती लावली. *या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार राजू टपाल आणि स्थानिक गुन्हे शाखा ठाणेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे साहेब यांची उपस्थिती लाभली.

फोरमचे अध्यक्ष डॉ. निता पाटील, डॉ. अमितकुमार गोईलकर आणि शिवश्री प्रभाकर भोईर यांनी या सभेचे सुंदर आयोजन केले. डॉ. निता पाटील फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने *●ग्राहक संरक्षण जागृती फोरम* *●अनिका महिला सक्षमीकरण कार्यक्रम* *●सर्व भाषिक शाळा- महाविद्यालयीन पालक संघ* आणि *●सांस्कृतिक विभागात नाटक/एकांकिका स्क्रिप्ट पूजन* या चार लोकाभिमुख नव्या सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. या सर्व उपक्रमांबद्दलची संपूर्ण माहिती डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी उपस्थितांना दिली व या सर्व उपक्रमांमध्ये ऍक्टिव्हली सहभागी होण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

फाऊंडेशनच्या वतीने घेतल्या गेलेल्या राखी मेकिंग स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण, फोरमच्या स्थापनेपासून अगदी जलद गतीने एक लाखांचा व्यावसायिक टप्पा पार करणारे फोरमचे व्यावसायिक सदस्य दिलीप राठोड आणि भूषण शाक्यवीर यांचा प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एक मिनिटांचे बिजनेस इन्ट्रोडक्शनच्या विजेतेपदाचे मानकरी आनंद तेंडुलकर ठरले. यावेळी 1 मिनिट इन्ट्रोडक्शन विजेत्याची निवड फोरमचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे या मान्यवरांकडून करण्यात आली. फाऊंडेशन आणि फोरमच्या अध्यक्षा डॉ. निता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना *आतापर्यंत 3 महिन्यात व अवघ्या सहा व्यावसायिक सभांच्या दरम्यान 58 लाख 96 हजार 447 रुपयांच्या रेफरन्स डन डिल्स पूर्ण* झाल्याचे सांगितले व लवकरच एक करोड रुपयांचा टप्पा पूर्ण करू असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता दोंद यांनी केले. या मीटिंगचे सर्व डिझाइन्स आणि क्रिएटिव्ह बॅनर्स आणि फोटोग्राफी फाऊंडेशनचे क्रिएटिव्ह डीजाईन पार्टनर क्रिएटिव्ह आयडियाज चे प्रमुख आशिष पाटील यांनी केले. पाहुणे राजू टपाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे पो.नि. व्यंकट आंधळे यांनी फाऊंडेशनच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या करियरमधील अनुभव व्यक्त केले.
 फाऊंडेशनचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष शिवश्री प्रभाकर भोईर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com