अशोक कामटे संघटनेतर्फे गणेश मंडळांकडून निर्माल्य संकलन... उत्स्फूर्त सहभाग - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 September 2019

अशोक कामटे संघटनेतर्फे गणेश मंडळांकडून निर्माल्य संकलन... उत्स्फूर्त सहभाग


सांगोला :-
सांगोल्यातील अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने सलग पाचव्या वर्षी शहर व उपनगरातील गणेश मंडळांकडून निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला .त्यातून शेतकर्यांना ऐन दुष्काळात मोफत खत देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे .पुढील वर्षीपासून गणेशमूर्ती संकलनाचा संकल्प संघटनेने केल्याची माहीती संस्थापक नीलकंठ शिंदे सर यांनी दिली .
संघटनेने केलेल्या आहवनानुसार शहर व उपनगरातील सुमारे ४० गणेश मंडळांनी आपले निर्माल्य जमा केले .त्यातून दोन ट्रॉयल्या निर्माल्य जमा झाले .त्यापैकी दिड ट्रॅक्टर ट्रॉली निर्माल्य शेतकऱ्यांना खतासाठी देण्यात आले .राहिलेले निर्माल्य नगर परिषदेने शहरात लावलेल्या वृक्षांना व रेल्वे स्टेशनवरील बागेतील झाडांना खत म्हणून वापरले जाणार आहे .त्यामुळे शहरात स्वछता राहून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल .जलप्रदूषणास पायबंद बसला आहे .त्यापासून शेतकऱ्यांना मोफत खतही मिळाले आहे .संघटनेच्या दहा कार्यकर्त्यानी शेवटचे ४-५ दिवसात मोठी मेहनत घेतली .त्यासाठी गणेशमंडळाबरोबरच घरगुती गणेश स्थापन केलेल्या कुटुंबीयांनीही चांगली मदत केली .यापूर्वी घरगुती गणेश स्थापनेचे निर्माल्य नगरपरिषदेच्या कचरा गाडीत टाकले जात होते .आता हि संघटना घरोघरी जाऊन गोळा करीत असल्याने त्याचे पावित्र्यही अबाधित राहिले आहे .टाकाऊ निर्माल्याच्या माध्यमातून खतनिर्मिति करून हे खत शेतकर्यांना मोफत देऊन त्यांना दुष्काळात मदतीचा हात देण्याचा प्रयत्न संघटना करीत आहे .संघटनेतील गरीब ,श्रीमंत सदस्य हे हलके काम समजत नाहीत .

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

त्यामुळे समाजात एक चांगला संदेश यामुळे जात आहे .निसर्गाचा समतोल राहील .गेल्या पाच वर्षात संघटनेने दहा ट्रॉल्या खत शेतकर्यांना मोफत दिले आहे .खत आपल्यासाठी राखीव ठेवावा म्हणून शेतकरीही संघटनेकडे या कालावधीमध्ये आवर्जून व आगाऊ संपर्क करतात .पुढील वर्षीपासून संघटना मूर्तींचेही संकलन करणार आहे ,त्यामुळे पाण्यातील प्रदूषणाबरोबर मूर्तीची अवहेलना थांबणार आहे .या उपक्रमासाठी संतोष महिमकर ,महावीर रणदिवे ,अच्युत फुले ,चैतन्य राऊत ,संदेश पळसे मयुरेश गुरव ,चारुदत्त खडतरे ,रविंद्र कुलकर्णी ,अड.हर्षवर्धन चव्हाण आदींनी परिश्रम घेतले ,अशी माहिती अशोक कामटे संघटनेने दिली .

_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add