मंगळवेढात महिलांसाठी नवकिरण महिला प्रतिष्ठान हे एक संजीवनी: सौ.रतन थोरवत


प्रतिनिधी: नवकिरण महिला प्रतिष्ठान, मंगळवेढा  यांच्यावतीने तालुक्यातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी "सशक्त महिला सबलीकरण" या विषयावर लक्ष्मीनारायण मंगलकार्यालय, मंगळवेढा, येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 सदर शिबिराचे उद्घाटन यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. नीलाताई आटकळे, तसेच जकराया मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रिया जाधव यांचे हस्ते संपन्न झाले.  नवकिरण महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अंजली समाधान आवताडे यांचे वतीने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती सौ. शिलाताई शिवशरण होत्या.

या मार्गदर्शन शिबिर प्रसंगी बचत गटाद्वारे यशस्वी बनलेल्या पंढरपूर येथील  उद्योजिका सौ. रतन संपत थोरवत यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी महिलांना सोबत घेऊन केलेला व्यवसाय कधीच अयशस्वी होत नाही. मी ही अशाच पद्धतीने बचत गटा द्वारे यशस्वी उद्योजिका म्हणून आज नावारूपाला आलेली आहे. नवकिरण महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सौ.अंजलीताई जो आजचा उपक्रम राबवत आहेत .  तो उपक्रम आता पर्यंतचा पंढरपूर मंगळवेढा मध्ये प्रथमच राबवला जात आहे.

 आशा प्रकारच्या उपक्रमामुळे आपल्या तालुक्यातील महिलांना सक्षम बनवून त्यांचे सबलीकरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे असे शेवटी त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी बचत गट मार्फत उद्योग कसा चालवावा व कशा पद्धतीने उभा करावा याबाबतचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले. 


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. नीलाताई आटकळे आपले मनोगत मांडताना म्हणाल्या की, मी एक महिला या नात्याने 32 वर्षे एका पत संस्थेमध्ये सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतरही स्वस्थ न बसता यशोदा पतसंस्थेची स्थापना केली आणि या पतसंस्थेचे काम मी यशस्वीपणे पार पाडत आहे.

 यावेळी सौ. प्रिया जाधव म्हणाल्या की, महिलांना सक्षम बनविण्यासाठी आज पर्यंत मी माझ्या संस्थेद्वारे अनेक बचत गटांना मदत केली आहे. यापुढेही त्यांना निश्चितच मदत करीत राहणार असल्याचे सांगितले व सौ. अंजलीताई आवताडे यांनी  बचत गटांना मदत करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. तो स्तुत्य व आव्हानात्मक असून तो नक्कीच यशस्वी करतील यामध्ये कुठलीही तिळमात्र शंका नाही.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना समाजकल्याण सभापती सौ. शीलाताई शिवशरण म्हणाल्या बचत गटाद्वारे महिलांनी एकत्र येऊन उद्योगांमध्ये यशस्वी होण्यासाठी उत्पादित करीत असलेल्या उत्पादनाची गुणवत्ता ही बाब महत्त्वाची आहे.  आपण तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उत्पादित झालेल्या वस्तूला शहरी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे प्रयत्नशील आहेत. 


ते एक यशस्वी उद्योजक असल्याने महिला बचत गटाला त्यांचे मार्गदर्शन निश्चितच मोलाचे असे असणार आहे. आजपर्यंत समाधान आवताडे यांनी महिला बचत गटाला वेळोवेळी मदत केलेली आहे. यापुढेही त्यांची मदत व मार्गदर्शन करण्यासाठी ते आग्रही आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व सौ. अंजलीताई यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रम हा नक्कीच यशस्वी होईल.

 मनामध्ये कुठलीही शंका न आणता आपण सर्वांनी आवताडे परिवाराच्या पाठीमागे उभे रहावे व बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करुन महिलांना समाजामध्ये पुढे येण्यासाठी एक प्रकारे संधीच उपलब्ध करून देत आहेत.या संधीचे सोने करून घ्यावे असे उपस्थित महिलांना आवाहन केले. 

_________________________________________________


_________________________________________________

नंदकुमार दुपडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना कोणते उद्योग, कोणत्या स्वरुपात, किती खर्चात करावेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. बाजारपेठेत कोणत्या उत्पादनाला जास्त मागणी आहे, उत्पादनाची प्रत याचा विचार करून आपण उद्योगात उतरले पाहिजे. दामाजी कारखान्याचे  चेअरमन समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली सौ.अंजलीताई स्वतः तुम्हाला मार्केटिंगसाठी मदत करणार आहेत. यामुळे तुम्हाला ही संधी आलेली आहे त्याचे सोने करा.

 माझ्या 15 वर्षाच्या मार्गदर्शनामध्ये मार्केटिंगची जबाबदारी उचलणारी नवकिरण महिला प्रतिष्ठान हे पहिलेच असुन माझ्या मते महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवताडे परिवाराने महिलांसाठी घेतलेली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आलेल्या संधीचा फायदा घ्यावा नवीन उद्योग उभा करुन सक्षम बनावे असे आव्हान शेवटी त्यांनी केले.

यावेळी आपल्या आभारपर भाषणामध्ये सौ.अंजलीताई आवताडे यांनी बचत गटातील कोणत्याही महिलांना कोणतीही अडचण आल्यास मी सक्षम पणे आपल्या पाठीशी उभे राहीन व आपण केलेल्या उत्पादनाला नवकिरण महिला प्रतिष्ठानचे  वतीने योग्य प्रकारे मार्केट उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली व सर्व उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे बचत गटाच्या मुख्य प्रवर्तकांचे आभार मानले. सुत्रसंचालन सौ.प्रियंका आवताडे व शेख मॅडम यांनी केले. 


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________

या मार्गदर्शन शिबिरासाठी पंचायत समिती, मंगळवेढ्याच्या उपसभापती सौ.विमल पाटील, जि.प.सोलापूर, नियोजन समिती सदस्य सौ. मंजुळा कोळेकर, पंचायत समिती सदस्य प्रेरणा मासाळ, सौ.उज्ज्वलाताई मस्के , दामाजी शुगर संचालिका सौ.कविता निकम, खरेदी विक्री संघ सदस्या सौ. सारिका पाटील, नगरसेविका सौ.निर्मला माने, सौ.रतन पडवळे, सौ.लक्ष्मीबाई म्हेत्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या.

 तसेच सदरील कार्यक्रमास पंढरपूरच्या डा.वृषाली पाटील, संत चोखामेळानगरच्या सरपंच सौ.इंदुमती शिंदे व तालुक्यातील महिला बचत गटाच्या मुख्य प्रवर्तक (सी.आर.पी.) मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com