आचारसंहितेपूर्वी विनाअनुदानित महाविद्यालयांना १००% अनुदान द्या अन्यथा स्वेच्छा मरणास परवानगी द्या - डॉ. रामदास नाईकनवरे१४नोव्हेंबर २००१ च्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना पूर्वलक्षी प्रभावाने शंभर टक्के अनुदान देणे किंवा मला स्वच्छ मरणास लेखी परवानगी देणे या संबंधीची मागणी कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी जि सांगली येतील मराठी विद्या मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रामदास नाईकनवरे यांनी लेखी निवेदनाद्वारे उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री विनोद तावडे यांना केली आहे .


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

यासंदर्भात २जुलै २०१८ रोजी त्यांनी राज्यपाल यांना पत्र दिले होते. त्यानुसार ३० जुलै २०१८ रोजी राज्यपाल यांचे कार्यालयाकडून शिक्षण विभागाकडे अधिकृत पत्र आले पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आपल्या निवेदनातडा. रामदास नाईकनवरे म्हणतात की, गेली नऊ ते दहा वर्षापासून मी माझ्या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दोन हजार ग्रंथांची लायब्ररी माझे घरात आहे. माझे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये शासकीय, निमशासकीय, विविध उद्योग, सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत क्रियाशील आहेत .शिक्षक म्हणून अनेक प्रकारचे लेखन केले आहे संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठ ,राज्य ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत ४०ते ४५ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत .एक शिक्षक म्हणून आजही माझे कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे .अनुदानित महाविद्यालयातील बिन पगारी एखादा शिक्षक यापेक्षा काय करू शकतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाविद्यालयाला अनुदान नसल्यामुळे पूजा पगारावर मला दिवस काढावे लागत आहेत.कुटुंबाच्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची बचत नाही. मधुमेह, रक्तदाब व हृदयाशी संबंधित अनेक आजार आणि शारीरिक व मानसिक व्याधीनी आम्ही त्रस्त आहोत .पगार नसल्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण ,आरोग्य त्यांचे करिअर व विवाह धोक्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या शैक्षणिक पदव्या असतानाही पगार नसल्यामुळे समाजामध्ये व नातेवाईकांमध्ये आमची पत राहिली नाही. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .आमच्या महाविद्यालयात अनुदान मिळावे म्हणून यापूर्वी अनेक लाक्षणिक संप, मोर्चे ,उपोषणे, आमरण उपोषण मी स्वतः सामुदायिक मध्ये सहभागी होऊन केली आहेत. राष्ट्रपती ,राज्यपाल, मुख्यमंत्री ,शिक्षणमंत्री व संबंधित खात्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे .यातून काही मार्ग निघाला नाही .त्यामुळे मी स्वेच्छा मरणाच्या निर्णयापर्यंत आलो आहे. त्यामुळे आपण गांभीर्याने विचार करून आचारसंहिता लागण्यापूर्वी विनाअनुदान महाविद्यालयास शंभर टक्के अनुदान द्या अन्यथा स्वेच्छा मरणास लेखी परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली असून या निवेदनाच्या प्रती राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठविल्या आहेत.


_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com