जेष्ठ वकील राम राम जेठमलानी यांचे निधननवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली. फाळणी होईपर्यंत जेठमलानी यांनी गावातच वकिली केली. फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली.
१९५९ मध्ये लढलेल्या के. एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्याने जेठमलानी यांचे नाव चर्चेत आलं. हा खटला त्यांच्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा खटला होता. त्यानंतर राम जेठमलानी यांनी राजीव गांधी हत्येतील आरोपींची बाजू मद्रास उच्च न्यायालयात मांडली. याबरोबर इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपींची बाजूही त्यांनी मांडली होती. शेअर मार्केट घोटाळ्यातील हर्षद मेहता व केतन पारेख यांचे वकील म्हणून त्यांनी काम केले.

 जेठमलानी यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी अफझल गुरू तसेच गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांचा खटला लढवला होता. जेसिका लाल खून प्रकरणात मनू शर्मा यांची बाजू जेठमलानी मांडली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदीही जेठमलानी यांची २०१०मध्ये निवड झाली आली होती. 
_________________________________________________


_________________________________________________

राम जेठमलानी सहाव्या आणि सातव्या लोकसभेत मुंबईतून भारतीय जनता पक्षाकडून संसदेत निवडून गेले होते. वकिलीबरोबर जेठमलानी यांनी केंद्रातही मंत्री म्हणून काम पाहिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सरकारमध्ये जेठमलानी यांनी कायदा मंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून काम केले होते. जेठमलानी यांनी २०१४ मध्ये लखनऊ लोकसभा मतदार संघातून वाजपेयी यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली होती.

_________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com