साहित्यामध्ये मानवी जीवनाचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य- रवि वसंत सोनार


पंढरपूर (प्रतिनिधी) :- “ धावपळीमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे अस्ताव्यस्त झालेल्या मानवी जीवनाचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य कविता, गझल तसेच एकूणच सर्व प्रकारच्या साहित्यामध्ये आहे. ” असे मत येथील विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील श्री बालाजी डेव्हलपर्सच्या माध्यमातून अभियंता दिनाच्या औचित्याने प्रायोजित आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठ, पंढरपूर व ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी गजल मुशायरा आणि कवी संमेलनच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. सुश्राव्य असा मराठीचा अभंग सादर करुन पुढे बोलताना कवी रवि वसंत सोनार म्हणाले “ कोणत्याही भाषेतील साहित्य हे मनोरंजन, प्रबोधन, चिंतन, मनन एकूणच मानवी जीवनास वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रभावित करत असते. ”
           वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या संमिश्र अशा गझल मुशायरा आणि कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील 
आनंद पेंढारकर (डोंबिवली), प्रशांत पोरे (पुणे), सुधाकर इनामदार (आटपाडी), कालिदास चवडेकर (सोलापूर), विश्वास कुलकर्णी (कोल्हापूर), दास पाटील (तुळजापूर), एजाज शेख (भुसावळ), विशाल राजगुरु (वाशी), सचिन कुलकर्णी, वैभव कुलकर्णी आणि मानसीताई केसकर (पंढरपूर) या नामवंत आणि प्रख्यात गझलकार व कवींच्या वैविध्यपूर्ण रचनांचे सादरीकरण संपन्न झाले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

या विविधतेने नटलेल्या सुश्राव्य आणि कर्णमधुर कार्यक्रमात कवी सचिन कुलकर्णी यांच्या “मेघ एखादा तरी हा पाझरू दे विठ्ठला, वाळलेले रान आता मोहरू दे विठ्ठला ” आणि “ या भुकेचा धर्म सांगा कोणता ? फक्त एकच जात आहे भाकरी ” अशा काव्य पंक्तींच्या सादरीकरणास साहित्य रसिकांनी भरभरून दाद दिली. पंढरपूर आणि परिसरातील क्रेडाई संघटनेचे सभासद, साहित्यिक तसेच साहित्य रसिक यांनी वैविध्यपूर्ण गझल व कवितांचा आस्वाद घेत टाळ्यांचा कडकडाट आणि वाहवा करत मनमुरादपणे दाद दिली.


           या काव्य आणि गझलोत्सवास क्रेडाई पंढरपूरचे विद्यमान अध्यक्ष मुकुंद कर्वे, मिलिंद देशपांडे, तुकाराम राऊत, आशीष शहा, अॅड सच्चिदानंद जोशी, प्रा. शिवाजीराव बागल, राजेंद्र झुंबर भोसले, दादासाहेब खरात, सुजीतकुमार कांबळे, राधेश बादले - पाटील, जितेंद्र शहाणे, मुरलेंद्र शेटे, प्रताप चव्हाण, संतोष शिरगिरे, अंकुश गाजरे, गणेश गायकवाड, सुर्याजी भोसले, उमेश सासवडकर, ऋतुजाताई शहा, प्रज्ञाताई बडवे, शोभाताई माळवे, शर्मिलाताई देशपांडे, मनीषाताई कुलकर्णी, सविता सोनार, रेखाताई चंद्रराव, सविताताई दूधभाते, वर्षाताई शहाणे, भाग्यश्रीताई लिहिणे, वैशालीताई शिंदे हे व इतर मान्यवर उपस्थित होते. 
          पंढरी नगरीत संपन्न झालेल्या या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण संमिश्र अशा गझल मुशायरा आणि कवी संमेलनाचे प्रास्ताविक परिमल सांस्कृतिक व्यासपीठ, पंढरपूरचे सर्वेसर्वा कवी श्रीकुल यांनी केले. संमिश्र अशा काव्य गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन कोल्हापूरचे कवी विश्वास कुलकर्णी यांनी केले तर श्री बालाजी डेव्हलपर्सच्या वतीने उपस्थित अभियंता, साहित्यिक व साहित्य रसिकांचे आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र झुंबर भोसले, दादासाहेब खरात, सुजीतकुमार कांबळे, प्रवीण भाकरे, ओंकार सोनार आदींनी विशेष परिश्रम घेतले. 
          यावेळी अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्यिक उपक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत अशी अपेक्षा पंढरी नगरीतील नागरिक, साहित्यिक व साहित्य रसिकांनी व्यक्त केली.

_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com