देशाला सुपर पॉवरच्या पातळीवर आणण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे - प्राचार्य डॉ. ए.एम.आगरकरस्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २०१’ या राष्ट्रीय तंत्रसंशोधन स्पर्धेचा समारोप
पंढरपूर- भारत देशाला सुपर पॉवरच्या पातळीवर आणण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे असून यासाठी ऑलम्पस सारख्या राष्ट्रीय स्तरावरील शोध स्पर्धा होणे अत्यंत गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नवनवीन शिकण्याच्या सुवर्णसंधी मिळतात.स्पर्धेच्या युगात आता विद्यार्थ्यांना अधिकाधिक आव्हाने स्विकारावी लागणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे.’ असे प्रतिपादन लातूरच्या शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम. आगरकर यांनी केले.
        
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________


येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या ‘ऑलम्पस २०१९’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धा कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून लातूरच्या शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम. आगरकर मार्गदर्शन करत होते. त्यांच्यासोबत प्रा. सीमा आगरकर, प्रा. अनिल बादाडे होते. प्रारंभी ऑलम्पस २०१९ चे संबंधात विद्यार्थी सचिवा मोनाली नागटिळक यांनी स्पर्धेसाठी बाहेरून आलेले स्पर्धक व ‘ऑलम्पस २०१९’ या संशोधनात्मक स्पर्धा आयोजिन्यामागील भूमिका स्पष्ट केली. प्रा. सीमा आगरकर म्हणाल्या की, ‘अभियंते हे निर्माते असून प्रथम स्वतःला तयार करा. ऑलम्पसमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना तांत्रिक ज्ञान मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतात.’ संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे म्हणाले की, ‘वैयक्तिक कामगिरी ही महत्वाची असतेच परंतु त्यात सांघिक सादरीकरणाला अधिक महत्व असते. अनुकूलता, समायोजकता, लवचिकता अशा गोष्टी या स्पर्धेतून शिकण्यासाठी मिळतात. यावेळी पुण्यातील ए.आय. एस.एस. एम.एस. महाविद्यालयाच्या श्रद्धा पोरे यांनी आपल्या मनोगतात ‘ऑलम्पसमुळे आम्हा स्पर्धकांच्या  व्यक्तिमत्व विकास तसेच आत्मविश्वास यात वाढ होते’ असे म्हणाल्या तर सिंहगड, कोर्टी महाविद्यालयाचे शुभम सूर्यवंशी म्हणाले ‘येथील सर्व सुविधा स्वेरीने सुव्यवस्थितपणे पुरविल्या असून कुठेही कमतरता भासू दिली नाही अशी सोय आजपर्यंत कुठेही झाली नाही. कार्यक्रमाचे नियोजन उत्तम व अप्रतिम होते त्यामुळे आम्हा स्पर्धकांना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळेच स्पर्धेत आम्ही हिरीरीने सहभाग घेता आला. स्पर्धेचा सराव करताना स्वेरीतील विद्यार्थ्यांनी व प्राद्यापकांनी अप्रतिम सहकार्य केले.’ या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास ३५ महाविद्यालयातील सुमारे ८०० हून अधिक स्पर्धक, ३१ स्पर्धा प्रकारात सहभाग घेतले होते तर स्वेरीतील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यापैकी बाहेरील विद्यार्थ्यांना स्पर्धेत अधिकाधिक प्राधान्य देवून जवळपास दोन लाखांची स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे, अशी बक्षिसे वितरीत केली तर रोख स्वरूपातील रक्कम विजेत्यांच्या खात्यावर ऑनलाईनद्वारे जमा करण्यात आली. 
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________या ऑलम्पस २०१९ शोध स्पर्धेच्या विविध इव्हेंटमध्ये शुभम सूर्यवंशी, रणजीत आसबे, श्रद्धा पोरे, मानसी चलकीकर, अमर राऊत, प्रशांत पती, नितीन एकमाळी, सचिन खताळ, सौरभ गायकवाड, समीर कदम, अभिषेक डोळस, हेमंत माने, श्रीकांत झुंजार, किरण माने, अमोल जगदाळे, जयदीप पाटील, समीर मुजावर, स्नेहल बरमाडे, पायल जाधव, साक्षी स्वामी, संस्कृती गोसावी, ब्रम्हेश मिथा,अभिषेक भोसले, श्रीकांत दहीहांडे, श्रीहर्ष हर्सूर, रोहन पाटील, आदित्य बलगी, प्रदीप विटकर, संकेत मारडकर, स्वप्नील बसुदे, अनमोल पाटील, आकाश कुरुंदवाडे, सुरज गात, शिवा अडसुळे, श्रद्धा कुंभार, रेणुका पोतदार, स्वप्नील आदलिंगे, अनुष्का चौगुले, शर्वरी जोशी, धीरज लाहोटी, शशांक सोनार, अरबाज सय्यद, समाधान काळे, सुमित फाटे, ओंकार बसाटे, ज्ञानेश्वर विटकर, रोहित यादव, शैलेश बुधराम, तिरूमलेश आदेली, युवराज पांचाळ, सुकुमार बंडगर, वासुदेव सुरवसे, मकरंद खिस्ते, जयप्रसाद गायकवाड, बापूसाहेब सावंत, दादासाहेब सावंत, जिज्ञासा सोनवणे, केदार पुजारी, संस्कृती किरकीरे, प्रतीक  पाटील,  रतनलाल पिंगळे, अक्षय खंकाळ, सुलभा चवरे, श्रीगणेश वाकसे, मयुर मंगेडकर, पार्थ आराध्ये, अनमोल लिंगे, नरेंद्र चव्हाण, अबूतालिब कुरेशी, अथर्व देशमुख, ऋषिकेश मांडवे, काजल कोकरे, अमेय दुधगीकर,अमृता शिंदे, जयश्री मिसाळ, राहुल गाडे, योगिता मस्के, मानसी शहाणे, वैष्णवी उंबरे, तनुजा घोलप, ओंकार पोरे, रोहन कर्णकोट, तानाजी कुंभारमदन पाटील, ओंकार कदम, वैष्णवी मोरे, ऋतुराज जाधव, समीर पठाण, ऋषभ जाधव, जयदेव ननवरे, अमित धनुरे, ईश्वरी शिदवाडकर, शितल नरळे, ओंकार कदम, प्रसाद मंगी, मानसी घोगले, मुस्कान आतार, सिद्धेश्वर खपाले, विकास धुमाळ, ओंकार गुंड, पांडुरंग मिसाळ, कोमल मोळक, सीमा कुंभार, उमेश गुरव, सुहासिनी मोरे, सुरज शिवपुजे, मल्हारी चव्हाण, श्रीनिवास भारती, शैलेश सावंत, प्रणिता जाधव, तेजश्री लेंडवे, सुशांत कुंभार, किरण केदार, चैताली बोचरे, मनीषा आखाडे, अश्लेशा पिसे, अपर्णा लिंबुरकर, अहिल्या डांगे, प्रणव शेडबाळे, योगिता माशाळ, करण बनसोडे, सुमित राठोड या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, ऑलम्पस २०१९ चे समन्वयक प्रा. डी.टी. काशीद, ऑलम्पसचे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील रोपळकर यांनी मानले.                  

_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com