गीता पांठातर व लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
पंढरपूर- योगेश्वर पुरूषोत्तम गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट पंढरपूर यांच्यावतीने गोकुळअष्टमी निमित्त घेण्यात आलेल्या गीता पांठातर व लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि.15 सप्टेंबर 2019 रोजी केमिस्ट भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या भागवत उपासक मोहिनी देशमुख उपस्थित होत्या. तर कार्यक्रम मुख्याध्यापिका माधुरी यारगट्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूरच्या भागवत उपासक मोहिनी देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक करून माझ्याकडून आवश्यक ते सहकार्य करण्यास तयारी असल्याचे सांगितले व गीतेचे जीवनातील महत्व पटवून दिले व मागील विद्यार्थ्यांचा आढावा घेण्यासाठी जुन्या विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याची सूचना केली. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला बोध हा आज प्रत्येक मानवाला लागू आहे. त्याच्या अचरणाप्रमाणे आपण जर वागलो तर कुठल्याही अडचणीला आपण सामोरे जावू शकतो. गीतेतील प्रत्येक शब्द हा उपनिदेशातून आलेला आहे. ही ब्रह्मविद्या आहे. 21 शतकात माणूस यांत्रिक बनत चाललेला आहे. संस्कृती व धर्माचा त्याला विसर पडत चाललेला आहे. ही धर्माची कास पकडत गीतेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम स्वातंत्र्यसैनिक कै.पुरूषोत्तम बाबुराव अढवळकर यांनी स्थापन केलेल्या पंढरपुरातील योगेश्वर पुरूषोत्तम गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट यांच्या माध्यमातून केले जाते, असे महत्व पटवून दिले. _________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

मुख्याध्यापिका माधुरी यारगट्टीकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये लहान मुलांसाठी गीतेचे आचरण व पठण हे योग्य वयात झाल्यास त्यांना गीतेचे पुढील आयुष्यामध्ये महत्व पटेल. गीतेतील तत्वज्ञान महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरूजी, स्वामी विवेकानंद या थोर मंडळींनी घेतले होते आणि म्हणूनच ते आपल्या आयुष्यात पुढे जावू शकले असे विचार व्यक्त केले.
 यावेळी प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत ट्रस्टचे कार्यवाहक मिलिंद अढवळकर यांनी केले. प्रास्ताविक द.सी.जोशी सर यांनी केले. संकल्प वाचन छाया अढवळकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय शिल्प चौंडवार यांनी केला. अहवाल वाचन अश्विनी कचरे यांनी केले. छोट्या मुलीने कु.किमया चोपडे हिने गीता पठण केले.

गीता पाठांतर व लेखन स्पर्धेचा पारितोषिक हे पहिली ते पदवीधरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय या पध्दतीने एकूण 51 स्पर्धकांना पारितोषिक, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला. कु.चोपडे हिला गीता पाठांतर केल्याबद्दल स्वतंत्ररित्या अरविंद कुलकर्णी यांनी बक्षीस देवून कौतुक केले.
या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.गोपाळराव गुणे, शुभदा गुणे, ढवळसकर, प्रा.अशोक डोळ, मामा फलटणकर, देसाई सर यांच्यासह गीता मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
_________________________________________________


__________________________________________________________________________________________________-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com