पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ- अखेर गुलाल भारतनानांचाच..! तब्बल 13 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवुन आमदार भारत भालके यांनी साधली हॅटट्रिक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 24 October 2019

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ- अखेर गुलाल भारतनानांचाच..! तब्बल 13 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवुन आमदार भारत भालके यांनी साधली हॅटट्रिक

Pandharpur Live : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असुन या मतदार संघात तब्बल 13 हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळवुन आमदार भारत भालके यांनी हॅटट्रिक साधली आहे. एका बाजुला दिग्गज नेत्यांची फौज तर दुसर्‍या बाजुला एकटे भालके असे चित्र या निवडणुकीत दिसुन आले. 

एकुणच प्रचार काळातील परिस्थिती पाहता ही निवडणुक आमदार भारत भालके यांना जड जाईल अशी शक्यता राजकीय विश्‍लेषकांमधुन व्यक्त होत होती; परंतु या निवडणुकीत जास्तीचे मताधिक्य मिळवुन आमदार भालके यांनी ही चर्चा फोल ठरविली. आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासुनच भालके यांना मिळालेले मताधिक्य सतत वाढत गेले. तिसर्‍या फेरीअखेर भालके 3 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर होते. हा मताचा चढता आलेख प्रत्येक फेरीमध्ये वाढतच गेला. पंढरपूरमधुनच नव्हे तर मंगळवेढा तालुक्यातुनही भालके यांना प्रचंड प्रमाणात मतं देवुन जनतेने आमचा आमदार’ म्हणुन भारत भालके यांना पसंती दिल्याचे दिसुन आले. आज पंढरपूर मधील शासकीय गोडाऊन मध्ये मतदान मोजणी सुरु असताना प्रत्येक फेरीतील भालके यांच्या मताची वाढती आकडेवारी ऐकुन भालके समर्थकांमध्ये उत्साह संचारलेला दिसुन आला. सर्वत्र गुलालाची उधळण करत व राष्ट्रवादीचे झेंडे फडकावुन आमदार भालके समर्थकांनी जल्लोष साजरा केलेला आढळुन आला.

  पडत्या पावसातही कार्यकर्ते उत्साहाने आनंद व्यक्त करताना आढळुन आले. मतमोजणी सुरु असताना निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी शिस्तबद्ध पध्दतीने ती हाताळली. यावेळी तहसिलदार वैशाली वाघमारे, नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. डीवायएसपी डॉ. सागर कवडे, पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, तालुका पोलीस निरीक्षक किरण आवचर, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

मतमोजणी प्रक्रिया सुरु असताना सिंघम म्हणुन ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे हे स्वतः कार्यकर्त्यांना शांततेचे व कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करत होते.

यावेळी आमदार भारत भालके यांनी माध्यमांशी बोलताना, शेतकर्‍याच्या पोराला जनतेनं पुन्हा निवडुन दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages