राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची दिशाभूल केली... ७० हजार कोटीचा घोटाळा केल्यामुळेच 16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या– गोपीचंद पडळकर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 18 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची दिशाभूल केली... ७० हजार कोटीचा घोटाळा केल्यामुळेच 16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या– गोपीचंद पडळकर

Pandharpur Live - मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला नसता तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सिंचन होऊन 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नसत्या असा घणाघाती आरोप धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर  येथील जाहीर सभेत केला.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भर पावसात तेथील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

व्यासपीठावर आ.सुजितसिह ठाकूर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, नामदेव जानकर, माजी सभापती अँड.नंदकुमार पवार, सूर्यकांत ठेंगील,रयतक्रांतीचे दीपक भोसले,जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, साईनाथ अभंगराव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुकाराम कुदले,रासपाचे बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे,दिनकर मोरे, सरपंच रामेश्वर मासाळ,बाबासाहेब बेलदार,जयंत साळे,कांतीलाल ताटे,नितीन पाटील,शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर,भीमराव मोरे आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पडळकर यांनी, राष्ट्रवादी व काँग्रेसवर जोरदार टीका करताना ही अलिबाबा व चाळीस चोराची युती असल्याचा आरोप केला. या सगळ्यापासून जर महाराष्ट्राला वाचवायचा असेल महायुतीचे सरकार मोठ्या मताने निवडून द्यावे असे आवाहन केले. 27 हजार कोटी रुपये या सोलापूर जिल्ह्यात विकासासाठी या सरकारने दिले. रस्त्यांचे डांबरीकरण, शेतकरी वर्गाच्या खात्यात थेट रक्कम जमा होतेय, दिल्ली ते थेट शेतकरी कुठलाहि दलाल नाही, मध्यस्त नाही. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकर्‍यासाठी सुरु केली आहे. 1 कोटी 27 लाख शेतकर्यांचा विमा उतरवला आहे. म्हणून सर्व समाजाच्या बांधवाना सांगा, सुधाकरपंत परीचारक आपल्या हक्काचा माणूस आहे त्यांना विधानसभेत पाठवा. ज्या दिवशी सुधाकरपंत यांचे तिकीट मिळाले त्याच दिवशी ते मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे आमदार झाले.

आ.भारत भालके यांनी गेल्या निवडणुकीत येथील धनगर समाजाला फसवून त्यांची मते मिळवली असून राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. राज्यातील धनगर समाजाला हक्काचे आरक्षण भाजप सरकारच देणार असल्याचे प्रतिपादन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

आ.भालके यांनी माझ्या विरोधात एक पत्रक काढले मी माझ्या समाजासाठी काय करतो हे सर्वांना माहिती आहे.त्यांनी आपल्या समाजासाठी राजीनामा देण्याचे केवळ नाटक केले.विरोधक विनाकारण स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी वाईट प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांचे नेते आरक्षनासाठी वेळ देत नव्हते. धनगर समाजाची केवळ त्यांनी दिशाभूल केली असल्याचा घणाघात त्यांनी केला. भालके यांनी गेल्या 10 वर्षात एकही विकासात्मक काम केले नसून अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरी बसवा, असे आवाहन केले.

याच महायुतीचे सरकारने सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नाव दिले. तर धनगर समाजासाठी 1 हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे. तसेच अनेक वर्षा पासून मागणी असलेल्या धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस देखील केली आहे.

यावेळी आ.प्रशांत परिचारक यांनी भाजपा-सेना महायुतीने खर्या अर्थाने वंचित बहुजन यांना न्याय दिला असल्याचे सांगितले. या मतदार संघात 10 वर्षापासून लबाड लांडगा जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला. स्वतःचे साखर कारखान्यासाठी 100 कोटी रुपयाचे कर्ज मिळवले परंतु 35 गावचे पाण्यासाठी 1 रुपयाही आणला नसल्याची टीका केली.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages