Pandharpur Live - पंढरपूरच्या जनतेने मला पंचवीस वर्षे आमदार म्हणून सांभाळले. यामध्ये फक्त गेली दहा वर्षाचा खंड होता. मात्र आता उद्याच्या 21 ऑक्टोंबरला मतदान करून परत मला पुढील पाच वर्षे जनतेने सांभाळावे जेणेकरून आपण जनतेची सेवा करू शकू. असे भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी केले.
महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ शहरातून प्रचार पदयात्रा निघाली होती. सदरच्या पदयात्रेचा समारोप शिवाजी चौकातील जाहीर सभेने झाला. या सभेसाठी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, दिपक वाडदेकर, विलास सांळुखे ,भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, श्रीकांत बागल,आरपीआचे संतोष पवार, जिंतेंद्र बनसोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख रवि मुळे, संजय घोडके, शिवाजी हळणवर, नानासाहेब वाघमारे , संतोष नेहतराव ,प्रभाकर भैय्या देशमुख , नगरसेवक डी राज सर्वगोड आदि याप्रसंगी उपस्थित होते.
या जाहीर सभेप्रसंगी पुढे बोलताना सुधाकरपंत परिचारक म्हणाले , जनतेने आपणास सेवेची संधी यापूर्वी दिली होती. आणि आता यानंतरही पुढे पाच वर्षे द्यावी यासाठी आपणास कमळ चिन्हासमोरील बटण दाबून निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत परिचारक म्हणाले , गेल दहा वर्षात भालकेंने दवाखाना बांधतो , कॉलेज बांधतो अशी आशवासने दिली होती. यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट या आमदाराने दहा वर्षात एक अंगणावाडी , बालवाडी , कॉलेज सुध्दा परिसरात उभे केले नाही. एकाही व्यक्तीला रोजगार मिळवून दिला नाही. इतकेच का तर साधी पिठाची गिरणी देखिल उभी केली नाही. असे म्हणत भालकेनी दिलेल आजर्पतच आश्वांसनाची आ. परिचारक यांनी खिल्ली उडवली.
भालकेंच्या शेतमजूरांचा परिचारकांना पाठींबाभारत भालके यांच्या शेतामधे गेली पाच वर्षे त्यांची शेती फुलवणारे शेतमजूर तथा त्यांचे खाजगी व्यवस्थापक पांडुरंग धायगुडे यांनी आज सुधाकरपंत परिचारक यांना पाठींबा दिला. यावेळी त्यांनी बोलताना पाच वर्षे झाली आपल्याला भालकेंने माझ कष्टांचे पाच लाख रूपये दिले नाही. त्यामुळेच त्यांना कंटाळून आपण परिचारकांना पाठींबा देत असलंचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
भालकेने कायमच फसवणंचे काम केले स्व औंदुबरआणा , विठठल कारखाना , शेतकरी , मंगळवेढातील 35 गावची जनता यांची फसवणूक केली. इतकेच काय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखिल फसवणूक करण्याचे काम आजर्पत त्यांच्याकडून घडले असल्याचा आरोप देखिल यावेळी परिचारक यांनी केला .
तसेच सध्याचे वारं बदललं आहे. घरची भाकरी खावून कार्यकर्त्यांनी मालकांचा प्रचार केला आहे . त्यामुळे विजय आपला निश्चित आहे. असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्क्त केला .
प्रसंगी विलास सांळुखे , दिपक वाडदेकर यानी राष्ट्रवादीचे शरद पवार यानी तसेच सुशिलकुमार शिंदे यानी देखिल सुधाकरपंत परिचारक यांच्यावर टीका केली नाही. तमुळे निश्चितच या दोन्हीही मातब्बर नेतंनी त्यांच्या समर्थकांना परिचारकांनाच निवडा असे सुचक वक्तव् केले असलंचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी संजय घोडके , जिंतेद्र बनसोडे, माउली हळणवर, संतोष नेहतराव , संजय वाईकर , दिपक भोसले , श्रीकांत बागल , नागेश भोसले आदिंची याप्रसंगी मनोगते व्क्त झाली.
सभेपूर्वी महात्मा्.फुले पुतळास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सुरूवात करत आली. यानंतर सदरची पदयात्रा गौतम वि्द्यालय , भाई भाई चौक , सांगोला चौक , काळा मारूती , चौफाळा , नाथ चौक , जुनीपेठ , अर्बन बॅक , भौसले चौक , महावीर नगर , डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , स्टेशन रोड मार्गावरून छ शिवाजी महाराज चौक याठिकाणी अभिावादन करून पदयात्रेचा आणि एकंदर प्रचाराचा समारोप जाहीर सभेने करन्यात आला. या संपूर्ण पदयात्रोस सुमारे 10 हजारांहून अधिकच समर्थकांचा उत्साह दिसून आला. या पदयात्रेमधून सुधाकरपंत परिचारक यांच्यासह मित्रत्रपक्षांचे पदाधिाकारी , उमेश परिचारक , युवानेते प्रणव परिचारक यांनी थेट जनतेला अभिवादन करून भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले.
गेले पंधरा दिवसात सुधाकरपंत परिचारक यंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रिय मंत्री रामदास आठवले , माजी उपमुखमंत्री विजयसिंह मोहीते पाटील , माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील , कृषीराज्यमंत्री सदाभाउ खोत , धनगर समाजाचे नेते गोपीपंच पडळकर , भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ , आमदार सुजितसिंह ठाकुर , सिनेअभिनेत्री सुरभि हंडे , माजी मंत्री लक्ष्मणाराव ढोबळे आदिंनी प्रचारामधे हजेरी लावली याशिावा राहुल शहा , नगरसेवक अजित जगताप , पंढरपूरातून संतोष नेहतराव , प्रताप आणि नागेश गंगेकर, प्रदिप तथा भैय्या पवार , तानाजी खरात , मंगळवेढा आणि पंढरपूरातील सर्व मोहीते पाटील समर्थक , नगरसेवक डी राज सर्वगोड, बळीराजा शेतकरी संघटनेचे माउली हळणवर , जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख , गणेश अंकुशराव आदिंनी सुधाकर परिचारक यांना तथा भाजपा महायुतीला पाठींबा दिला आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे


आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
No comments:
Post a Comment