उद्या गुलाल कुणाचा...? पंढरपूर लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 23 October 2019

उद्या गुलाल कुणाचा...? पंढरपूर लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट

पंढरपूर Live  (भगवान वानखेडे) :- 
कधी नव्हे ती यावेळची पंढरपूर विधानसभा मतदार संघाची ही निवडणुक बरेचसे संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे. नेमके कोण निवडुन येणार याचा अंदाज बांधणं कठीण होवुन बसलेलं आहे. या निवडणुकीकडे पंढरपूर लाईव्हने टाकलेली ‘एक नजर’.
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये परिचारक-भालके यांच्यात खरी लढत असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांमधुन व्यक्त होत आहे. मागील निवडणुक भारत भालके यांना तशी सोपी गेली असली तरी ही निवडणुक म्हणावी अशी सोपी जाणार नसल्याची चर्चा आहे. मंगळवेढा तालुक्यातील समाधान आवताडे यांचा वाढलेला प्रभाव आणि काँग्रेसच्या काळुंगे यांची उमेदवारी यामुळे भालके यांना मिळणार्‍या मतांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीत परिचारक, भालके किंवा आवताडे यांच्यापैकी ज्या उमेदवाराच्या मतांमध्ये घट होईल त्या उमेदवाराचा गट पुढील काळात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणातुन हद्दपार होईल हे मात्र निश्‍चित.  
परिचारकांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची!
       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्‍वासाने सुधाकरपंत परिचारक यांच्या बाजुने कौल देत त्यांना उमेदवारी दिली. याचबरोबर भाजपा व मित्रपक्षांची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करुन दिलेली आहे. त्यामुळे ही निवडणुक परिचारकांसाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली आहे. मागील पंचवार्षीक निवडणुकीत परिचारक गटाकडून असलेली प्रशांत परिचारक यांची उमेदवारी व आत्ता सुधाकरपंत परिचारक यांची उमेदवारी यात खुप मोठा फरक आहे. सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत मंगळवेढा तालुका मतदार संघात नसतानाही या तालुक्याकडे दुर्लक्ष केलेले नव्हते. परिचारक यांचे राजकारणच मुळात गट-तट व आपला भाग वगैरे भेदभाव करणारे नव्हते. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात त्यांना मानणारा विशिष्ट वर्ग आहे. पंढरपूर तालुक्यात तर निर्विवाद त्यांचे वर्चस्व आहेच. युटोपियन शुगर्स च्या माध्यमातुन परिचारक गटाने मंगळवेढा तालुक्यातील युवकांना मिळवुन दिलेला रोजगार आणि शेतकर्‍यांना दिलेला दिलासा या बाजुही त्यांच्या दृष्टीने जमेच्या आहेत. याचबरोबर या निवडणुकीत परिचारकांच्या सोबत विजयसिंह मोहिते-पाटील, लक्ष्मण ढोबळे, राहुल शहा, कल्याणराव काळे अशी नेत्यांची मजबुत फळी होती. या नेत्यांना मानणारा मोठा वर्ग मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात आहे. या निवडणुकीत परिचारक यांनी झंझावाती प्रचार केलेला आढळून आला. याचा फायदा परिचारक यांना झाला तर अटीतटीच्या या लढतीत परिचारक बाजी मारतील. अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.    
भालके यांची हॅटट्रिक होणार की 
आवताडे-काळुंगेंच्या उमेदवारीचा फटका बसणार?  
          भारत भालके यांना लाभलेला जनाधार ही त्यांची आजवरची सर्वात मोठी शक्ती आहे असेच म्हणावे लागेल. कारण कोणतीही मोठी संस्था, उद्योग नसताना त्यांनी मातब्बरांपुढं कडवं आवाहन उभं केलं. राजकारणात शुन्यातुन विश्‍व निर्माण करत सलग दोन वेळा आमदारकी मिळवुन दाखवली. आमदार भालके यांनी सर्वसामान्य माणसांना आपलंसं केलं, सामान्यांच्या अनेक प्रश्‍नांवर विधीमंडळात उठवलेला आवाज आणि सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात वेळोवेळी घेतलेला सहभाग ही त्यांची जमेची बाजु आहे. परंतु या निवडणुकीत मात्र भालकेंसमोर मंगळवेढा तालुक्यातील दोन मराठा समाजाचे उमेदवार उभे होते. मराठा समाजाची मते भालके, आवताडे व काळुंगे अशी 3 ठिकाणी विभागली गेली तर भालकेंच्या मतांचा टक्का घटणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील जनेतेने आवताडे व काळुंगे भुमीपुत्रं असल्याने स्थानिक नेताच आपला आमदार पाहिजे म्हणत मतदान केले असेल तर याचाही फटका भालकेंना व परिचारक या दोघांनाही बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या निवडणुकीत जिंकुन भारत भालके हॅटट्रिक साधणार की आवताडे व काळुंगे यांना मिळालेल्या मतांचा त्यांना फटका बसणार? या प्रश्‍नावर दोन्ही तालुक्यातील चौकाचौकात चर्चा रंगलेली आढळुन येत आहे.
आवताडेंचा मतांचा टक्का वाढणार....
 मंगळवेढ्याच्या राजकारणात चढता आलेख!
          अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या मतांचा टक्का निश्‍चितच वाढणार असुन राजकीय क्षेत्रात त्यांचा चढता आलेख कौतुकास्पद आहे. मंगळवेढ्यातील एक प्रभावी तरुण राजकीय नेता म्हणुन त्यांनी आपली छाप पाडण्यात यश मिळवलेलं आहे. दामाजी साखर कारखाना, सुतगिरणी, कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या माध्यमातुन त्यांनी तब्बल 2000 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय. ही सर्व माणसं आणि कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या प्रचाराला लागलेली आढळली. मंगळवेढा तालुक्याच्या 80 गावात त्यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला. वाड्या वस्त्यांवरील त्यांचा संपर्क व मंगळवेढा तालुक्यातील 25 ते 30 गावात त्यांचा असणारा प्रभाव या निवडणुकीत नक्कीच फलदायी ठरणार असुन त्यांच्या मागील पंचवार्षीक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांचा टक्का चांगलाच वाढणार असल्याचे चित्रं स्पष्ट होत आहे. 
        काँग्रेस आय चे उमेदवार काळुंगे यांचा धनश्री परिवार मंगळवेढा तालुक्यात एकसंध आहे. त्यांचा स्वतंत्र गट तर आहेच याशिवाय काँग्रेसचा पंजा पाहुन मतं देणारा काँग्रेसचा पारंपारीक मतदारही डावलुन चालणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे काळुंगे यांनी 10 हजार मते मिळवली तर त्यात आश्‍चर्य मानण्यासारखं काहीच नाही.
10 हजारांहुन अधिक मताधिक्य मिळवुन परिचारक निवडुन येतील. असा दावा परिचारक समर्थक करत आहेत तर भालके समर्थकांनी मंगळवेढा तालुक्याच्या 35 गावासह पंढरपूर तालुक्यातील 22 गावात आघाडी घेवुन  भालके निवडुन येतील अशी शक्यता वर्तविली आहे. समाधान आवताडे यांच्या समर्थकांकडूनही विजय आमचाच! असल्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात नंबर एकचे मतदान ज्याला होईल तो उमेदवार या निवडणुकीच्या रणांगणात विजय मिळवील आणि यावरच या निवडणुकीच्या निकालाचे भवितव्य ठरलेले असेल.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages