Pandharpur Live - परिचारक यांनी आजपर्यंत दलित मराठा यासह अठरापगड जातींना सोबत घेऊन राजकारणापेक्षा समाजकारण अधिक केले. त्यामुळे असा नेता विधानसभेत असणे गरजेचे आहे. या पुढील अनेक वर्षे भाजपचे सरकार काही जाणार नाही. आपण सरकारच्या पाठीशी आहोत.मंगळवेढा येथील संत चोखामेळा तसेच संत बसवेश्वरांचे स्मारक काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच संत दामाजीपंत यांचे स्मारक उभारून सुशोभीकरण करावयाचे आहे. यासाठी महायुतीचे सरकार आल्यावर राज्याची तिजोरी पूर्णपणे खुली करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी केले.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे आठवले यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, स्टार प्रचारक हरिश्चंद्र भोई, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार,चरनूकाका पाटील,नगरसेवक अजित जगताप,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,माजी सभापती शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी,शिवसेना शहरप्रमुख सुनील दत्तू,रासपचे धनाजी गडदे, आरपीआयचे नेते सुनील सर्वगोड, संतोष पवार, जितेंद्र बनसोडे आदीजन उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे


आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
प्रसंगी पुढे बोलताना ना.आठवले म्हणाले, मंगळवेढ्याच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याकरिताच सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेत पाठवले तर येथील संत चोखामेळा, संत बसवेश्वर स्मारकाचे काम पूर्णपणे मार्गी लागू शकेल. मंगळवेढा तालुक्यातील जमिनीला पाणी मिळाले तर सोने उगवेल अशी इथली जमीन आहे. यासाठी येथील पाणीप्रश्न यासारखे अनेक प्रश्न देखील मार्गी लागतील. मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना हक्काचे घर दिले आहे. याकरिताच महायुतीला साथ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवेढा येथील सिंचन योजनेसाठी पुढील काळात निधी उपलब्द करून पुढील काळात ती पूर्ण करुन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचे पाणी देनेत येणार आहे. विठ्ठल साखर कारखाना बंद करण्याचा घाट घातला जात असून तो आपण पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू करू असे म्हणत त्यांनी आपल्या कवितेतून विरोधकांवर निशाणा साधला.
आपण पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झालो. या दोन्ही वेळेस आपल्याला निवडून पाठवण्यात सर्वात मोठा वाटा सुधाकरपंत परिचारक यांचा होता. त्यामुळे आता त्यांच्याविरूद्ध असणाऱ्या दुश्मनाचा काटा काढण्यासाठी आपण मंगळवेढ्यात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुधाकरपंत परिचारक प्रशांत परिचारक हे दोघेही चांगले नेते आहेत त्यांना विकासाची जाण आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
या पुढील अनेक वर्षे भाजपचे सरकार काही जाणार नाही. आपण सरकारच्या पाठीशी आहोत. या सरकारच्या माध्यमातूनच आरपीआय आणि बहुजन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यास शासनाच्या विविध समित्यांवर तसेच महामंडळांवर देखील काम करण्याची संधी येत्या काळात दिली जाणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक बोलताना म्हणाले , मंगळवेढ्याच्या आणि पंढरपूरच्या विकासासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. अनेक रस्त्यांची कामे या संपूर्ण परिसरात भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. भाजपा सरकारतर्फे बसवेश्वर स्मारकाला देखील मंजुरी मिळाली आहे. येथील पाणीप्रश्नासाठी भाजप सरकार मधील मंत्र्यांच्या मध्यस्थीने मार्गी लावणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
No comments:
Post a Comment