Pandharpur Live- पंढरपूर दि.13: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी 252-पंढरपूर विधानसभा मतदासंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, सहा.मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे व्दितीय प्रशिक्षण दाते मंगल कार्यालय, सांगोला रोड, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले असून, या प्रशिक्षणास मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य निवडणूक निरिक्षक वीरेंद्रसिंह बंकावत, निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली वाघमारे उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे


आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
या प्रशिक्षणास मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक निरिक्षक वीरेंद्रसिंह बंकावत म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत निवडणूका घेतल्या जातात. विविध कक्षामार्फत निवडणूकीचे काम नियोजनबध्द पार पाडले जाते. निवडणूकीच्या या राष्ट्रीय कार्यक्रमाला आपण सर्वजण एकत्र आला आहे. देशातील निवडणुका या शांततापुर्ण वातारणात पार पडतात. या सर्व प्रक्रिया आपल्या कामामुळे शक्य झाल्या असल्याचेही निवडणूक निरिक्षक बंकावत यांनी सांगितले.निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व निवडणूक प्रक्रिया प्रशिक्षणाव्दारे समजून घेतली असेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.ढोले यांनी सांगितले की, मतदानासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व मतदान प्रक्रीया पार पाडावी. यावेळ मतदान कार्यपध्दती, ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅट कसे हातळावे, मतदान प्रक्रीयेवेळी कोणतीही अडचण येऊ नये मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच वेळेचा अपव्यव होऊ नये, यासाठी यंत्र हातळणीचा अधिकाअधिक सरावा व्हावा यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केल्याचे सांगितले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. वैशाली वाघमारे यांनी प्रशिक्षणात मतदान साहित्य ताब्यात घेताना घ्यावयाची काळजी, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर गेल्यावर करावयाची कार्यपध्दती, मतदान यंत्राची जोडणी,मॉकपोल सुरु होण्याअगोदरची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.
यामध्ये पहिल्या सत्रात 720 व दुस-या सत्रात 720 कर्मचा-यांचे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. तसेच यावेळी टपाली मतदान सुविधा केंद्रही गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु ठेण्यात आले होते. _________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
No comments:
Post a Comment