जर्मनीचे वॉल्टर सोलोमन यांची स्वेरीला सदिच्छा भेट - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 15 October 2019

जर्मनीचे वॉल्टर सोलोमन यांची स्वेरीला सदिच्छा भेट

पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील तंत्रज्ञान आणि संस्कृती यामुळे होणारा विकास स्वागतार्ह असून भारतातील शिक्षण व्यवस्था  दर्जेदार होत आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेच्या युगातही भारत देश विश्वात चर्चिला जात आहे.’ असे प्रतिपादन जर्मनीमधील फायनान्शियल सर्विसेस अॅण्ड बिझनेस लॉ कंपनीचे विक्री व्यवस्थापक वॉल्टर सोलोमन यांनी व्यक्त केले.
       स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला जर्मनीच्या फायनान्शियल सर्विसेस अॅण्ड बिझनेस लॉ कंपनीचे विक्री व्यवस्थापक वॉल्टर सोलोमन यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आणि प्राध्यापकांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी सोलोमन यांचे स्वागत करून संस्थेच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे सांगितले. यावेळी ते जर्मनी आणि भारत देशांमधील शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक व क्रीडा विषयावर मार्गदर्शन करत होते. जर्मनीचे सोलोमन हे सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्याकडे सर्व क्षेत्रामधील ग्राहक आहेत. ते वित्तीय सेवाव्यवसाय कायदा आणि पत व्यवस्थापनात कार्य करतात. त्यांनी जर्मनीमध्येच काही भारतीय मित्र बनवले असून त्यापैकी काही मित्र पंढरपूरच्या स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. निखिल बिरादार, अनंत कवडेराजेंद्र रोंगे आणि सागर देशपांडे हे चारही स्वेरीचे माजी विद्यार्थी सोलोमन यांचे मित्र आहेत. वॉल्टर यांना स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘भारत दौरा करीत आहातच तर ‘स्वेरी’ शिक्षण संस्थेला भेट द्यावी’ अशी विनंती केल्यामुळे आणि उत्कृष्ट सुविधांचा अभ्यास दौरा करण्याच्या हेतूने विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग यांना मार्गदर्शन करावे म्हणून आज स्वेरीला भेट देण्याचा योग आला.’ असे सोलोमन यांनी सांगितले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________
पुढे त्यांनी इंग्रजीमधील संवादाचे महत्त्वआयपीआरशेतीसाठी सहकारात्मक प्रकल्पशिक्षणउद्योगाचे आधुनिकीकरणसंस्कृतीतील फरक, उच्चशिक्षण या संदर्भात मार्गदर्शन करून अभियांत्रिकीनंतर पदव्युत्तर शिक्षण, रोजगाराच्या आणि उद्योगाच्या अनेक संधी जर्मनीमध्ये उपलब्ध असून यामध्ये भारतातील अनेक अभियंते कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. आयटी आणि जीडीपीविद्यार्थी व्हिसाखेळजर्मन भाषा याबाबत देखील सोलोमन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वेरीच्या शिस्त आणि शैक्षणिक पद्धतीवर समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत बोलताना सोलोमन म्हणाले की ‘आपण कोणत्या ठिकाणी जन्म घेतला हे महत्वाचे नसून आपल्यातील प्रेरणा आणि आपली ध्येयाप्रती प्रयत्न करण्याची जिद्द महत्वाची आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली शिस्त व आदर अनुकरणीय असून संस्कारित करणे ही अवघड गोष्ठ आहे आणि स्वेरीमध्ये सहज साध्य केली जाते याचा अभिमान वाटतो.’ असे गौरवोदगार सोलोमन यांनी काढले. यावेळी सोलोमन यांनी स्वेरी कॅम्पस मधील सर्व विभाग, वसतिगृहे, अद्ययावत प्रयोगशाळा, वर्कशॉप, संशोधन विभाग, आरएचआरडीएफ, मशीन लॅब, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलसह विविध विभागांना भेटी देवून सविस्तर माहिती जाणून घेतली त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधून मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधेची माहिती देखील जाणून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत राज कुर्लेकर, विलास कदम, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. प्रविण कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्यासह सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन संशोधन अधिष्ठाता डॉ. श्रीदेवी यांनी केले तर आभार शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी मानले.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages