शेतकरी जात्यात तर शहरी मध्यमवर्गीय सुपात - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Wednesday, 16 October 2019

शेतकरी जात्यात तर शहरी मध्यमवर्गीय सुपात

article by 
Satish Deshmukh
President: Forum Of Intellectuals
G-65, Aditya Nagar, Gadital, 
Hadapsar, Pune-411028.
Maharashtra State, India

"सात बारा कोरा करणार" असे निवडणुक वचननामा जाहीर करताना अप्रत्यक्ष कबुली दिली आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. पाच वर्षे काय झोपले होते का? 
मराठीत एक वाक्यप्रचार आहे. 'झोपी गेलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग केलेल्याला जागे करता येत नाही. चुकीची म्हण आहे. सोंग केलेल्याला उठवायचे असेल तर त्याच्या पेकाट्यात लाथ मारावी.
शिवाय दुर्बुद्धी महामार्ग व इतर प्रकल्पा मध्ये शेतकऱ्यांची जमीन गिळंगृत करून तुम्ही त्यांचा ७/१२ कोरा केलाच आहे की. 
कालच्याच, माहिती आधिकारातुन बाहेर आलेल्या बातमीनुसार  तीन वर्षात कर्ज बुडव्या बड्या उद्योगपतींचे 2.75 लाख कोटी रू. कर्ज माफ केले आहे. त्यांना कुटुंबाचा निकष, ऑन लाईन अर्ज, उलाढालीच्या अटी, शर्ती व विलंब लावला का? बड्या धेंड्यांची कर्जे माफ केली हे जाहीरनाम्यात होते का?

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________
बँकेंनी तीन वर्षात केलेली कर्ज माफी रु. खालील प्रमाणेः
एस बी आयः 76,600 कोटी 
पी एन बीः 27,024 कोटी
आय डी बी आयः 26,219 कोटी
कॅनराः 19,991 कोटी
बँक फ इंडियाः 11,654 कोटी

...यादी अजुन मोठी आहे.

ह्याच कर्ज माफीचा काही भाग वेगळ्या मार्गाने उद्योगपती सत्ताधार्यांच्या पक्षाला निवडणूकी साठी देतात. हे भ्रष्टाचाराचे आधुनिकीकरण आहे. त्यालाच इलेकट्रोल बॉण्ड असे गोंडस नाव दिले आहे दिले आहे. ज्याबद्दल पक्षाला माहिती देणे बंधनकारक नाही. पारदर्शक भ्रष्टाचार. 

रिझर्व्ह बँक फ इंडियाचे ह्यांच्यावर काहीच नियंत्रण राहिलेले नाही. सरकारने आरबीआय कडुन भविष्यातील राखीव तरतुदीतुन 1.76 लाख कोटी रू. अनाधिकृतपणे घेतले आहे. हा खरे तर आकस्मिक जोखीम साठा (Contigency Risk Buffer) असतो.
तिकडे पीएमसी बँकेतील खातेदारांचा जमवलेला एक एक घामाचा पैसा बुडाला आहे. अशीच अवस्था राहिली तर प्रत्येक नोटांवर लिहलेले वचन "मैं धारक को ....रू. अदा करने का वचन देता हुँ l", हे पण त्यांना पाळता येणार नाही.

_________________________________________________
_________________________________________________
शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर आर्थिक शिस्त बिघडेल असे अर्थमंत्री म्हणत होते. आता नाही बिघडत?

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत असून तिचा विकास दर बांगला देश व नेपाळच्याही मागे आहे. मी बऱ्याच वेळा लिहले आहे की ह्या मंदीचे मूळ हे सरकारच्या कृषिद्रोही धोरणात आहे . त्यांनी औद्दोगिक व सेवा क्षेत्राला डोक्यावर घेऊन कृषी विभागाला सावत्रपणाची वागवणूक दिली आहे. जोपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरांच्या खिशात पैसा खेळत नाही तोपर्यंत ही खोट्या विकासाची सूज  नाही. 
आज महाराष्ट्रात दररोज १२ आत्महत्या होत आहेत . त्याचे एक महत्वाचे कारण कर्जबाजारीपणा हे आहे . 
पण शेतकरी जरी जात्यात असला तरी शहरातील मध्यमवर्गीयांची परिस्थिती पण भविष्यकाळात बिकट आहे. नोकरी नाही व ज्यांना होती ती अकस्मात गेली. "३७०" वेळा टाळ्या वाजवून पोट भरत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सात वेळा कपात केली आहे. त्यामुळे बँकेतील ठेवीदारांचे व्याजाचे दर पूर्वी ११.५ % होते ते ६.५ % पर्यंत खाली उतरले आहेत.  वयस्कर लोकांचे निवृत्ती नंतरचे आर्थिक नियोजन  पार कोलमडले आहे. 

जागतिक बँकेच्या बदलेल्या निकषामुळे भारताला विकसनशील देशांच्या यादीतून वगळण्यात आले आहे . 

मराठीत एक म्हण आहे. "घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा ". अशी सरकारची नीती आहे. चुकीचे निर्णय, खोटा डोलमोल, तज्ज्ञांची वाण, काल्पनिक (Virtual) भावनिक आवेश ह्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, भारताने सहा देशांना गेल्या चार वर्षात सुमारे २१,१०० कोटी रुपयांची खिरापत वाटली आहे. 

सरकारच्या वादग्रस्त एफ आर डी आय विधेयकाची धास्ती सामान्य जनतेच्या मनामध्ये घर करून आहे. दोन वर्षांपूर्वी हे विधेयक पारित करण्याचा प्रयत्न, तीव्र निषेदामुळे असफल झाला होता. हे मान्य झाले असते तर तुमचा बँकेतील पॆसा, बँक बुडाल्यास, तुमचा राहणार नव्हता. 

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________
शेतकयांच्या फसव्या प्रलंबित कर्जमाफी बद्दल मी तीन लेख लिहले होते. पण सरकारवर काही परीणाम नाही. 
1) कर्जमाफी- ऐतिहासिक स्मार्ट भामटेगिरी
2) शेतकरी तुरुंगात तर गांढुळ शेतात
3) कर्जमाफी नको, राइट फ करा

शहरातील लोकांना वर्तमानपत्रातील जाहीराती बघुन वाटते शेतकऱ्यांना किती वेळा कर्जमाफी द्यायची. त्यांनी समजावुन घ्यावे ही लुट वापसी आहे._________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Ad