पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला समाधान आवताडे शिवाय पर्याय नाही : प्रा.येताळा भगत - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 17 October 2019

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला समाधान आवताडे शिवाय पर्याय नाही : प्रा.येताळा भगत



Pandharpur Live मंगळवेढा- पंढरपूर-मंगळवेढा हा मतदारसंघ कुणी वाली नसलेला मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रात ओळख होऊ लागली आहे टोकण निधी मंजूर झाला,उडविले फटाके, तत्वत: मंजूरी मिळाली म्हणून कागद फडकविला,एवढच काय तालुका दुष्काळी म्हणून जाहीर झाला तरीसुध्दा फटाक्यांची आतषबाजी करणारे लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला लाभले हे आपले दुर्भाग्य आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्याशिवाय या लोकप्रतिनिधींनी काहीच केले नाही,त्यामुळे  या मतदारसंघात परिवर्तनाचं वादळ आलेलं आहे. या मतदारसंघाला समाधान आवताडेशिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहा असे आवाहन शिवसेनेतचे माजी तालुका प्रमुख प्रा.येताळा भगत यांनी केले. ते अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते.


पुढे बोलताना प्रा.येताळा भगत म्हणाले, आमदार नसताना समाधान आवताडे यांनी अनेक कामे केलेली आहेत. अनेकांचे संसार उभे करुन त्यांचे अर्थकारण मजबूत केले आहे. मतदारांनी यावेळी समाधान आवताडे यांना संधी दिल्यास या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार हे मी छातीठोकपणे सांगतो.पदव्यांचे भेंडोळेच्या भेंडोळे घेवून बेरोजगारांचे लोंढे शिकून बाहेर पडत आहेत. या युवकांना रोजगाराच्या संधी नाहीत. आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी रोजगार निर्मीतीचे काम केले नाही.

 समाधान आवताडे यांनी पंढरपूर येथे नोकरी महोत्सव घेवून १८०० तरुणांना नोक-या मिळवून देवून त्यांना आर्थिक स्थैर्य दिले. अपंगांना कृत्रीम हात-पाय देवून त्यांना मदतीचा हात देवून समाजामध्ये ताठ मानेने उभे केले. शेतक-यांचे मंदिर असणाऱ्या दामाजी साखर कारखान्याचे पावित्र्य जपण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. कारखान्याच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्तीव्दारे ते पूर्ण करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हयात सर्वात जास्त निधी खेचून आणून योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. एवढी कामे करुनही कामाचा कधी गाजावाजा केला नाही. मात्र कांही मंडळी न केलेल्या कामांचा गाजावाजा करण्यात पटाईत आहेत. पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावचा मी दौरा केला आहे. लोकांचा समाधान आवताडे यांना उस्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे तर  लोकप्रतिनिधीबध्दल प्रचंड चिड, राग व्यक्त होत आहे. या मतदारसंघात  परिवर्तन अटळ आहे हे चांगले समजले आहे. एक तरुण, तडफदार, विकासाचं नवं मॉडेल आणू पहाणारं नेतृत्व आपल्याला लाभले आहे, यासाठीच यावेळी समाधान आवताडे यांना संधी देण्याचे आवाहन  प्रा.येताळा भगत यांनी केले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages