पंढरपूर- 65 एकर परिसरात होणार महायज्ञ; महायज्ञासाठी 108 कुंड व भागवत कथेचेही आयोजन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 30 November 2019

पंढरपूर- 65 एकर परिसरात होणार महायज्ञ; महायज्ञासाठी 108 कुंड व भागवत कथेचेही आयोजन

65 एकरमध्ये भव्य शामीयाना; यज्ञ कुंडासह सर्व तयारी अंतीम टप्प्यात


पंढरपूर Live :  पंढरपूर येथील चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या 65 एकर परिसरात भव्य अशा भागवत कथा व अष्टोत्तर 108 कुंडात्मक श्री लक्ष्मीनारायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राजेंद्रप्रसाद बोहरा (इचलकरंजी) यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.



दि. 6 डिसेंबर रोजी यज्ञ प्रारंभ होऊन 14 डिसेंबर रोजी यज्ञाची पुर्णाहुती होणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात व परिवारामध्ये सुख-शांती-उत्तम आरोग्य नांदण्यासाठी व सर्वांवर लक्ष्मीनारायणाची कृपा निरंतर राहण्यासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञाचा शुभारंभ महायज्ञ आयोजक श्री श्री 108 श्री सीताराम दास जी महाराज (बल्डाधाम, लिचाना, जि. नागौर, राजस्थान) व यज्ञाचार्य वैदिक गणपतीविश्‍वनाथ शास्त्री (जयपूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कालावधीत गौ सेवी संत संवित कैलाशचंद्रजी जोशी महाराज यांच्या सुमधुर वाणीतुन श्रीमद् भागवत कथेचे श्रवण ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. यावेळी हेमाद्री संकल्प, दशविधी स्नान, विष्णु श्राध्द, प्रायश्‍चित हवन, जल कलश यात्रा, प्रयोग, पंचांग पूजन, मंडप प्रवेश, वास्तुपुजन, आचार्यदिवरण आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी अरणिमंथन (अग्निस्थापन), योगिनि क्षेत्रपाल, नवग्रह प्रारंभ पुजन व हवन आरंभ आदी करण्यात येणार आहे. रविवार 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत नित्यार्चन हवन, पुर्णाहुती, महाप्रसाद सुरु रहाणार आहे.  यासाठी महायज्ञ समिती गठीत केली असुन त्यामध्ये राजस्थान येथील भगिरथ सिंग, दिनेश पोषक, इचलकरंजी येथील गोविंद बजाज, राजेंद्रप्रसाद बोहरा, शामसुंदर काबरा, पंढरपूर येथील नंदकिशोर मर्दा, किसनगोपाल भट्टड, सोलापूर येथील ब्रीजमोहन फोफलिया, प्रकाशजी मर्दा आदींचा समावेश आहे.


सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये अशा प्रकारचे भव्य असे 108 कुंडात्मक श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ व श्रीमद्भागवत कथा पारायण होत असुन याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages