नवं सरकार : पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे निर्णय - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 29 November 2019

नवं सरकार : पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे निर्णय

पंढरपूर Live : शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर लवकरच भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असून त्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा वास्तववादी लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.

शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीचा शपथविधी झाल्यानंतर सह्य़ाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368 
................................................. 
 जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, मुख्य सचिव अजय मेहता यावेळी उपस्थित होते. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या योजना आणि त्यांचे वास्तवातील चित्र मंत्रिमंडळासमोर मांडावे, असे मुख्य सचिवांना सांगितले आहे. 

शेतकऱ्यांसाठी खूप योजना जाहीर होतात, घोषणांचा पाऊस पडतो. पण त्यांच्या पदरात पडतात असे नाही. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले पण खात्यात पैसेच जमा झाले नाही, असे अनेक प्रकार राज्यातील दौऱ्यात समोर आले. आम्हाला शेतकऱ्यांना नावाला नाही तर भरीव मदत करायची आहे. त्यामुळे वास्तववादी चित्र पाहून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिलाच प्रस्ताव छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्याचा आला. ते मंजूर करण्याचे भाग्य मिळाले, असेही ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात विदर्भ-मराठवाडय़ाचा उल्लेखच नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावल्याबद्दल विचारले असता, ते मुख्यमंत्री होते. मंत्रिमंडळ किंवा राज्य सरकार एका विभागाचे नसते तर संपूर्ण राज्याचे असते याचे भान त्यांना असायला हवे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

दहशतीचे वातावरण संपवणार : महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्यांचे असेल. दहशत वाटेल असे वातावरण राज्यात राहू देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राजकीय दहशतीच्या राजकारणावर अप्रत्यक्ष नेम साधला.

राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणार : विश्वासदर्शक ठरावानंतर आमचे सरकार राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी त्याबाबतची तयारी करण्याची सूचना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्य सचिवांना देण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages