महाराष्ट्रात 'ठाकरे' पर्वाला सुरुवात... उध्दव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 28 November 2019

महाराष्ट्रात 'ठाकरे' पर्वाला सुरुवात... उध्दव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ




Pandharpur Live - 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या  'महाराष्ट्र विकास आघाडी 'च्या सरकारचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी शिवाजी पार्कवर पार पडला. यात महाराष्टचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या स्टाईलने शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आणि माझे आई वडीलांना स्मरून 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे' अशा शब्दात शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत शपथ घेतली.


या शपथविधीला देशभरातील नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, कपिल सिब्बल, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे आदींसह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की.. असं म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावर घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला.


त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन नेत्यांनीही शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी आई वडिलांच्या स्मृतींना स्मरुन शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शपथ घेतली. तर सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शपथ घेतली.



जयंत पाटील यांनी वडिलांसोबत आईचंही नाव घेऊन शपथ घेतली. तसंच शरद पवारांचंही नाव त्यांनी शपथ घेताना घेतलं. तर छगन भुजबळ यांनी महात्मा फुले, सावित्री फुले, शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला स्मरुन तसंच शरद पवारांचं नाव घेत त्यांनीही शपथ घेतली. 


त्यांच्यासोबतच बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
'हीच ती वेळ' असा नारा देत शिवसेनेने निवडणूक प्रचार केला. शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. लोकांनी कौलही महायुतीलाच दिला होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपा आणि शिवसेना यांचं मुख्यमंत्रीपदावरुन झालेलं भांडण आणि त्यानंतर झालेला घटस्फोट हा महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली.


महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम
  • शिक्षण
- राज्यातील शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार
- राज्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्जाची सुविधा देणार!!
  • बेरोजगारी
- राज्यातील बेरोजगारांसाठी त्वरित रखडलेल्या सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया मार्गी लावणार
- सुशिक्षित तरुण बेरोजगारांना शिष्यवृत्ती सुविधा राबवणार
- महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये ८०% आरक्षण हे स्थानिकांसाठी मिळावं याकरिता राज्यात नवा कायदा अमलात आणणार
  • महिला
- महिला सुरक्षेचा मुद्दा हा या सरकारचा सर्वात महत्वाचा घटक असेल
- आर्थिकरित्या मागास कुटुंबातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची सुविधा
- नोकरदार तरुण युवतींसाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारणार
- अंगणवाडी सेविकांच्या मासिक भत्यात अथवा मानधनात वाढ करणार आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणार
- महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार
  • शेतकरी
- अवकाळी पावसामुळे दुष्काळाने ग्रासलेल्या भागांमध्ये जनतेच्या सेवेसाठी तातडीने आवश्यक ते सहकार्य करणार
- राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करणार
- दुष्काळात पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी संबंधीत यंत्रणेत आवश्यक ते बदल करणार
- पिकाचा हमीभाव ठरवण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी अमलात आणणार
- दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी शाश्वत जलसाठा मोहीम राबवणार
  • शहरी विकास
- शहरी भागातील रस्तेबांधणीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणणार तसेच नगरपरिषद,नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणीसाठी अथवा डागडुजीसाठी विशेष आर्थिक अनुदानाची तरतूद करणार
- मुंबईसह सबंध महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येणाऱ्या गोरगरिबांना ५०० चौ.फूट घरे मोफत दिली जाणार
  • उद्योग
- महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष सवलती राबवणार तसंच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि सरलीकृत करणार
- महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या उद्योगाना चालना मिळावी यासाठी त्याच्या योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करणार
  • पर्यटनकला आणि संस्कृती
- महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सर्व ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार
  • सामाजिक न्याय
- महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती,इतर मागासवर्गीय, धनगर,बलुतेदार आदी जनतेच्या अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या मूलभूत गरजांच्या सोयीसुविधा संविधानातील तरतुदींप्रमाणे अग्रक्रमाने पुरवणार
- महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक वर्गातील सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेणार
  • इतर महत्वाच्या तरतुदी
- जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेष सुविधा राबवणार
- अन्न आणि औषध या बाबतीतल्या सुरक्षेच्या प्रश्नी दुर्लक्ष कारणाऱ्यांविरुद्ध किंवा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद करणार
- सामान्य नागरिकांना केवळ दहा रुपयात स्वच्छ आणि परवडणारं जेवण/अन्न पुरवणार
या किमान समान कार्यक्रमाची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी अथवा सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य कॅबिनेटची एक आणि महाविकासआघाडीच्या सर्व पक्ष सदस्यांची एक अशा दोन स्वतंत्र समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

1 comment:

  1. Good evening,first of all thank to Namdar.Shri.Sharadchandraji.pawar.saheb,to New chief minister of maharashtra congratulation to new ministry of maharashtra,thank to all state maharashtra people's to give chance to establish new government of maharashtra

    ReplyDelete

Pages