शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी – छगन भुजबळ - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 17 November 2019

शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी – छगन भुजबळ

Pandharpur Live मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नसल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी आठ हजारांची तर फळबागांसाठी अठरा हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित करण्यात आली आहे.यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की,खरीप पिकांसाठी एकरी ३२०० रुपये आणि फळबागांसाठी एकरी ७२०० रुपये मदत ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे. ३२०० रुपयात तर बियाणे सुद्धा येत नाही आणि फळबागेत तर ७२०० रुपये हा दोन दिवसांचा फवारणीचा खर्च असतो.महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली असती तर त्यांना काही अंशी दिलासा मिळाला असता असे ते म्हणाले. 

याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.मात्र शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे त्याचबरोबर कर्जवसुली ला स्थगिती देणे हे राज्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होते.शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना रब्बीच्या पिकांसाठी बीबियाणे आणि खते घेण्याकरिता ठरावीक रक्कम तातडीने बिनव्याजी देणे आवश्यक होते. कारण एक वर्षांपूर्वी दुष्काळ घोषित झालेल्या शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही तर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आणि ते रब्बीसाठी भांडवल कधी उभे करणार हाही प्रश्नच असल्याचे भुजबळ म्हणाले.


_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages