संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयाचे आदय कर्तव्य- श्रीमंत कोकाटे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 30 November 2019

संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयाचे आदय कर्तव्य- श्रीमंत कोकाटे

पंढरपूर Live : आटपाडी
संविधानाने सार्वभौमत्व , समाजवाद , लोकशाही , धर्मनिरपेक्षता , न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधूता इत्यादी मुल्यांची ग्वाही दिली दिलेली असून  आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य , जीवीताचा अधिकार , शिक्षणाचा अधिकार ,शोषणाविरूध्दचा अधिकार दिलेला आहे . त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे आदय कर्तव्य आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक व प्रसिद्ध वक्ते श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले  आहे .
राजेवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून  श्रीमंत कोकाटे बोलत होते . अध्यक्षस्थानी राहुल पुजारी हे होते. 

श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले , संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे , आपले संविधान कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही , तसेच ते कोणत्याही धर्माचा अनुनय करत नाही . अल्पसंख्याकांच्या विकासाची ग्वाही संविधान देते . महिलांना स्वातंत्र्य , त्यांचा आदर आणि सन्मान याची तरतूद संविधानात आहे . संविधानाने एस .सी . , एस .टी . , ओबीसी , मराठा इत्यादी वर्गाला आरक्षण दिलेले आहे . संविधानाने जसे अधिकार दिलेले आहेत , तशीच कर्तव्य देखील सांगीतलेली आहेत .
संविधान, राष्ट्रध्वज , राष्ट्रगीत ,भारतीय स्वातंत्र्यलढा , पर्यावरण इत्यादींचा आदर व रक्षण करणे , वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे , वैविध्याचे संरक्षण करणे , महिलांचा आदर करणे ही संविधानाने सांगीतलेली कर्तव्ये आहेत असे स्पष्ट करून श्रीमंत कोकाटे शेवटी  म्हणाले ,  आज संविधान धोक्यात आहे , दिल्लीत संविधान जाळले गेले , संविधान बदलण्याची भाषा केली जाते , सरकारी उद्योगांचे व शिक्षणाचे खाजगीकरण करून संवैधानिक हक्क संपुष्टात आणले जात आहेत . त्यामुळे प्रत्येक नागरीकांची जबाबदारी आहे की संविधानीक मुल्यांचे जतन व रक्षण करणे हे आदय कर्तव्य आहे .

प्रारंभी स्वागत प्रास्तावीक शिवाजी साबळे यांनी केले . महामानवांच्या प्रतिमांचे पुजन श्रीमंत कोकाटे , पोपटराव तथा पी .एम . वाघमारे , कृष्णात शिरकांडे यांनी केले . श्रीमंत कोकाटे यांचा सन्मान सरपंच सौ .द्रोपदा तुकाराम कोडलकर यांच्या हस्ते करणेत आला .

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी कार्यकारी अभियंता पी.एम. तथा पोपटराव वाघमारे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कृष्णात शिरकांडे , सिने अभिनेत्री सिया पाटील राजेवाडीच्या सुपुत्र आणि सुपुत्रीचा श्रीमंत कोकाटे यांचे हस्ते सन्मान करणेत आला .

राजेवाडीच्या श्री .श्री . सदगुरु सह साखर कारखान्याचे चेअरमन एन . शेषगिरी राव यांनी या विधायक उपक्रमास कारखाना सदैव सहकार्य करेल अशी भावना व्यक्त केली तर अभिनेत्री सिया पाटील यांचेही या उपक्रमाचे कौतूक करणारे भाषण झाले.

अक्षर गंगा प्रज्ञाशोध परिक्षेतील गुणवंत निरंजन राजकुमार कुंभार , प्रणमय योगेश मंडलिक , राधेय संजय कुंभार , साक्षी भिवा सातपूते , एस. एस. सी. तील प्रज्ञावंत रुतुजा विनायक आवारे , अथर्व विकास शिरकांडे , आदित्य बजरंग सांगण , निर्कता बिभीशन शिरकांडे, निशा हनुमंत मंडले , रोहन रमेश मोरे , गायत्री चंद्रकांत मोरे , गौरी खडतरे यांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते गौरव करणेत आला . 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमाजी चव्हाण आणि राहुल साबळे यांनी केले .
यावेळी गटविकास अधिकारी मधुकर देशमुख , पशुधन विकास अधिकारी यशोदीप कांबळे , सातारा येथील माजी प्राचार्य शहाजी डोंगरे , सातारा येथील बांधकाम उदयोजक बाळासाहेब शिरकांडे , बाबासाहेब देशमुख बॅकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील - शिरकांडे , नवनाथ मोरे पुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . शेवटी कृष्णा मोरे यांनी आभार मानले .

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages