भाजप ने लोकशाहीचा गळा आवळला असून जनतेने जन्माची अद्दल घडवावी – भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी

Pandharpur Live - मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  प्रेतांचे ढीग रचून सत्तेवर कब्जा करण्यात वाकबगार असलेल्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आता लोकशाहीचाच गळा आवळला आहे. राजकीय नैतिकतेचे ढोल वाजवणाऱ्या भाजपने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्याचे सर्वांनी पाहिले आहे. आपले बहुमत नाही हे माहीत असूनही रात्रीच्या अंधारात कट रचून सकाळी सकाळी देवेंद्र फडणविसांना परत मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. भाजप, अजित पवार आणि राज्यपाल या सर्वांनी मराठी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सर्व लोकशाही प्रथांची हत्या करणाऱ्या या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य समिती अतिशय तीव्र शब्दात निषेध करत असून महाराष्ट्रातील जनतेने भाजपला जन्माची अद्दल घडवावी, असे आवाहन करत आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

गेले अकरा दिवस राष्ट्रपती राजवटीच्या आवरणात लपून घोडेबाजार करण्यात भाजपला अपयश आल्यानंतर त्या पक्षाने धाकदपटशाचे हत्यार बाहेर काढले हे उघड आहे. ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरूंगात टाकायला हा पक्ष उतावीळ झाला होता, त्या अजित पवारांना त्यांच्या भ्रष्टाचाराची पावती म्हणून उपमुख्यमंत्रीपद बहाल केले आहे. भाजप सत्तेसाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतो, या पक्षाने राजकारण चोर दरवडेखोरांच्या ताब्यात कसे दिले आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केवळ आपली कातडी बचावण्यासाठी भाजपला सामील झालेल्या अजित पवारांनी केवळ आपल्या पक्षाचाच नव्हे तर लोकशाहीच्या रक्षणार्थ बाणेदारपणे उभ्या राहिलेल्या मराठी जनतेचा अपमान केला आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याचा आरोप असलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सह्यांच्या कागदाचा गैरवापर करून तो राज्यपालांना सादर केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भ्रष्टाचार आणि भ्याडपणासोबतच त्यांना फसवणुकीच्या आरोपापासून पळ काढता येणार नाही. विरोधी पक्षाच्या नेत्याच्या कमजोरीचा अनिर्बंध सत्तेच्या गैरवापरासाठी नीच खेळी, अशीच नोंद भाजपच्या या कारस्थानाची झाल्याशिवाय राहणार नाही. या सर्व प्रकरणात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आणि त्यांना नियंत्रित करणाऱ्या मोदी-शहा यांच्या भाजप-प्रणित केंद्र सरकारने या पदाची प्रतिष्ठा पार धुळीला मिळवली आहे. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले हे गृहस्थच संविधानाच्या हत्येत सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. अकरा दिवसांची राष्ट्रपती राजवट पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी उठवली आणि त्यांनी तासाभरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथ समारंभ पारही पाडला हे त्यांचे कृत्य अघटीतच नसून निंदनीयही आहे. राज्यपाल या संविधानात्मक पदाची इतकी अवहेलना अजिबात सहन करता कामा नये. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवण्याचा प्रस्ताव पाठवला, त्यावर पहाटेच भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करून त्यावर राष्ट्रपतींची सहीही घेण्यात आली, हे संविधानाची हत्या करणारे दरबारी कारस्थानच आहे. भाजपच्या राजवटीत लोकशाहीच्या जिवाला केवढा मोठा धोका निर्माण झाला आहे, याची दखल जनता घेल्याशिवाय राहणार नाही. या सर्वावर कडी म्हणून राज्यपालांनी या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसना सरकार बनवण्याचा दावा सिद्ध करण्यासाठी काही तासांचीही जास्त मुदत न देणाऱ्या राज्यपालांची ही कृती अतिशय निषेधार्ह आहे. आज भाजपविरोधी सरकार स्थापन करण्याचा भक्कम दावा येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तर या कारवाईचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे. राज्यपाल महोदयांनी चोवीस तासांच्या आत फडणवीसांना विधानसभेच्या सभागृहात आपले बहुमत सिद्ध करायला सांगावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजपविरोधी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी या तोतया सरकारचा दणदणीत पराभव करावा, कारस्थानी देवेंद्र फडणवीस आणि गद्दार अजित पवारांना जन्माची अद्दल घडवावी, असे आवाहन मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष करत आहे. माकपचे आमदार या जनताद्रोही कृत्याच्या विरोधात खंबीरपणे उभे राहत विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करतील.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________

_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com