आमदारकीच्या शेवटच्या विधानसभेत मा आ गणपतरावजी देशमुख...

आबासाहेब, वरदान लाभो तुम्हा, अमृतमय आरोग्याचे, सदैव नवचैतन्याचे..!....

कोळा/वार्ताहर
कोणी विचारवंत एकदा असं म्हणाले होते की पाया पडावं असे खूप कमी पाय आज सार्वजनिक जीवनात उरले आहेत. अगदी खरंच आहे ते. सार्वजनिक जीवन मग ते राजकारण असो अथवा इतर कोणतंही क्षेत्रं, पाया पडावं असे खूप कमी पाय उरलेत. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या पाया पडावं अशी जी काही मोजकी नावं आहेत त्यात शंभर नंबरी सोन्यासारखं असलेलं एक नाव आहे. ते म्हणजे गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख. गेली एक दिड वर्षे मला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आवारात अधिवेशनकाळात वावरण्याची संधी मिळते आहे. पहिल्यांदा जेव्हा विधिमंडळात वावरलो तेव्हा 'आबासाहेब' या नावाविषयी असलेला प्रचंड आदर मी पाहिला आणि आबासाहेबांशी संवाद साधला पाहिजे, असं मनात येऊन गेलं. आज ती संधी मिळाली. 
     आबासाहेब देशमुख गेली दहा वीस नव्हे तर तब्बल पंचावन्न वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आहेत. पहिल्यांदा ते 1962 साली विधानसभेत निवडून गेले आणि त्यानंतर सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडुन येत आहेत. आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील देखील 1962 सालीच विधानसभेत निवडून गेल्या होत्या. आबासाहेबांच्या प्रचाराला त्यांचा संपूर्ण खर्च लोक करतात आणि कार्यकर्ते प्रचाराला येताना स्वतःच्या घरून भाकरी बांधून आणतात. हे ऐकून विश्वास बसत नाही मात्र हे सत्य आहे. एक विशेष मुद्दा असा की शेतकरी कामगार पक्ष हा नाही म्हणालो तरी जनाधार कमी असलेला पक्ष आहे किमान संसद आणि विधानसभेतील प्रतिनिधीत्वाच्या बाबतीत तरी. मात्र, तरीही केवळ वैचारिक बांधिलकी आहे म्हणून आबासाहेब शेकाप कडून निवडणूक लढवतात आणि निवडूनही येतात. आबांकडे पाहून ज्या पक्षाची राज्यात हवा आहे, त्या पक्षाकडे पळत सुटणाऱ्या आमदारांची किव येते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
आबांना भेटल्यावर त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की, 'सातत्याने गेली 50 वर्षे निवडून येण्याचे रहस्य काय?' त्यांनी हसत हसत उत्तर दिलं, 'लोकांचं प्रेम !' संपूर्ण संभाषणात डावी विचारसरणी, तिचा उदय आणि अस्त, टेंभू- म्हैसाळ जीहे कटापूर सांगोला शाखा योजना,  गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राचं बदलत गेलेलं राजकारण आदी विषयांवर आबा सविस्तर बोलले. मी त्यांना मध्येच विचारलं, कुठेतरी माझ्या वाचनात आलं होतं की त्यांना एकदा एका पक्षाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. त्यावर त्यांनी पहिल्यांदा उत्तर देणं टाळलं, मात्र थोडं खोदून विचारल्यावर बोलले. त्यांनी हे मान्य केलं की त्यांना एका पक्षाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. अर्थात, त्यांनी ती नाकारली. कारण त्यासाठी त्यांना शेकाप सोडावा लागणार होता. आबासाहेबांनी मुख्यमंत्री पद नाकारलं पण पक्ष सोडला नाही. काही वर्षांनी हि गोष्ट दंतकथा वाटेल ! याच विषयावर बोलता बोलता पुढे आबासाहेब म्हणाले 'हे पाहा मी काही आमदार, मुख्यमंत्री व्हावं म्हणून राजकारणात आलो नाही, मला इथे राहून लोकांचे प्रश्न सोडवता येतात म्हणून मी या क्षेत्रात आहे' 
     पन्नास वर्षे सातत्याने निवडून येण्याचं अजून एक रहस्य आबासाहेब 'लोकसंपर्क आणि लोकांचे प्रश्न सोडवणे' हेही सांगतात. आजही आमदार निवास ते विधानभवन ते बसने येतात आणि जातात. दुसरीकडे पहिली टर्म असलेले आमदार ज्या काही गाड्या वापरतात त्यांची नावंपण आपल्याला सांगता   येणार नाहीत. 
     महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांविषयी आबासाहेबांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, '1980 सालापर्यंत महाराष्ट्रात आमदार मुख्यमंत्री ठरवायचे, मात्र 1980 नंतर दिल्लीतील हायकमांड मुख्यमंत्री ठरवायला लागले आणि तिथून प्रॉब्लेम सुरू झाला'
_________________________________________________
_________________________________________________
विधानसभेत पहिल्या बाकांवर आबासाहेब बसतात. ते बोलायला उभे राहिले की राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वजण शांतपणे ऐकतात. आजही बैठकांमध्ये 'मुख्यमंत्री महोदय, तुमचे अधिकारी तुमची दिशाभूल करत आहेत' हे फक्त आबासाहेब सूनावू शकतात. आबासाहेबांना काही वर्षे मंत्रिमंडळात देखील काम करण्याची संधी मिळाली. अर्थात, त्यांनी त्याचं सोनं केलं हे वेगळं सांगायला नको. मात्र मंत्रिपद गेल्यावर मंत्रिपदाची वस्त्र अगदी आनंदाने उतरून ठेवली आणि आमदार म्हणून वावरू लागले. 'माजी मंत्री' असल्याचा तोरा मिरवावा असं त्यांना कधी वाटलं नाही. आमच्या संपूर्ण संभाषणात मी काही व्यक्तींबद्दल त्यांना खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी 'ते माझे राजकारणातील सहकारी आहेत' असं बोलून त्यांच्याबद्दल नकारात्मक टिप्पणी करण्यास नकार दिला. हे खरं मोठेपण ! खासगीतही दुसऱ्या राजकीय पक्षात असणाऱ्या लोकांविषयी नकारात्मक टिप्पणी करण्यास ते नकार देत होते.
     विधानसभेला उभारलो नाही कारण मला डोळ्यांनी कमी दिसायला लागलंय' एवढंच उत्तर दिलं. डोळ्यांनी कमी दिसत असलं तरी राजकारणात कायम राहणार आहे आबासाहेब त्यांच्या  आवश्यक ते सर्व वाचून घेतात. आजही प्रत्येक पत्राची दखल घेऊन उत्तर देतात. प्रचंड उर्जेनं ते काम करतात.  महाराष्ट्रातील कोणत्याही आमदार महोदयांना आयुष्यभर विरोधी पक्षातील आमदार राहणं हि कल्पना देखील सहन करवणार नाही. मात्र, आबासाहेबांनी सारी हयात आनंदाने विरोधी पक्षात काढली. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आबासाहेबांच्या विरोधात कोणताही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. एकप्रकारे त्यांच्या दिर्घ राजकीय कारकिर्दीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली हि मानवंदनाच होती.
     1978 च्या शरद पवार साहेबांच्या मंत्रीमंडळात राजारामबापू पाटील, ग. प्र. प्रधान, एन. डी. पाटील, सदानंद वर्दे, आबासाहेब देशमुख, उत्तमराव पाटील, हशु अडवाणी, सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे, निहाल अहमद असे मातब्बर लोक मंत्री होते. आजच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री बाजूने गेले तरी ओळखू येत नाहीत ! आबासाहेबांच्या  खोलीतून निघताना त्यांचा हात मनापासून हातात घेतला आणि पायाला स्पर्श केला. छान वाटलं. अशी कृतार्थता खूप कमी वेळा लाभते.आबासाहेबांसारखी व्यक्ती महाराष्ट्रात आहे याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटायला हवा. आबासाहेब उर्फ गणपतराव देशमुख हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभूषण आहेत, अशी माझी धारणा आहे. आबासाहेब, वरदान लाभो तुम्हा, अमृतमय आरोग्याचे, सदैव नवचैतन्याचे..!

_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com