उद्यापासून खर्डीत सीताराम महाराज नामसप्ताह उत्सव सुरू - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 16 November 2019

उद्यापासून खर्डीत सीताराम महाराज नामसप्ताह उत्सव सुरू

24 नोव्हेंबर रोजी ’भंडारा’
Pandharpur Live- 
खर्डी: (अमोल कुलकर्णी)- सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणार्‍या खर्डी येथील श्री सीताराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह चे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्ट यांचे वतीने देण्यात आली.दिनांक 17रोजी हरिनाम सप्ताह सुरू होईल. मानाप्रमाणे सप्ताहाचे सात दिवस केसकर(कुलकर्णी) घराण्याकडे प्रत्येकी एक दिवस पूजा नैवेद्य आरतीचा मान असतो.दिवसभर प्रवचन, कीर्तन ,रात्रभर जागर ,पारायण केले जाते.आठवडाभर मंदिर ट्रस्ट ,ग्रामस्थ तसेच भाविक यांचेकडून रोज मिष्टान्न भोजन वाटपाच्या पंगती चे आयोजन केले आहे.यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी,अध्यक्ष दीपक रोंगे,सचिव गंगाधर केसकर,विकास कुलकर्णी,उमेशराव परिचारक आदी उपस्थित होते.

भंडारा हा मुख्य उत्सव 

दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कार्तिक वद्य त्रयोदशीला पुण्यतिथी उत्सव म्हणजे भंडारा साजरा केला जातो. श्रींच्या समाधीवर दुपारी 12 वा पुष्पवर्षाव केला जातो.आरती व महाप्रसाद वाटप केले जाते.त्यानंतर पालखीचे मिरवणूक होते.राज्याबरोबरच कर्नाटक ,गुजरात,आंध्र प्रदेश आदी भागातून भाविक हजेरी लावतात.
या यात्रा कालावधी साठी ग्रामपंचायत खर्डी च्या वतीने सर्व तयारी स्वछता ,पाणीपुरवठा,लाईट,पार्किंग सज्ज असल्याची माहिती सरपंच रमेश हाके यांनी दिली .यात्रा कालावधीत वाहन गावात येऊ न देता बाहेरून जाण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.याकरिता उपसरपंच प्रणव परिचारक व सर्व सदस्यांबरोबर ग्रामसेवक ,अण्णा कावरे ,लिपिक बंडूलाल पठाण ,पोपट कावरे,प्रभू गायकवाड, आदी परिश्रम घेत आहेत.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages