कार्तिकी एकादशीमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केले वारकऱ्यांवर औषधोपचार - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 11 November 2019

कार्तिकी एकादशीमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केले वारकऱ्यांवर औषधोपचार

Pandharpur Live Web- 
पंढरपूर- स्वेरीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे राज्याला माहितच आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक, क्रीडा, विधायक आदी सांघिक उपक्रमात देखील स्वेरीचे विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभाग घेत असतात. हे पाहून प्रशासन देखील स्वेरीला विविध उपक्रमासाठी पाचारण करत असते. यामध्ये स्वच्छता अभियान असो, निर्मल वारी असो, पोलीस मित्र बनून दर्शन रांगेतील  वारकऱ्यांना मार्गदर्शन करायचे असो, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन असो हे सर्व स्वेरीचे विद्यार्थी तन मन धनाने सामाजिक कार्यात झोकून देतात आणि कार्य पार पाडतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो.

नेहमीप्रमाणे यंदा देखील आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीला स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला मदत केली असून या मदतीमुळे पोलीस प्रशासनावरील भार थोड्या प्रमाणात का होईना स्वेरीतील विद्यार्थ्यांमुळे हलका झाला आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात सहभाग घेताना कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने स्वेरी संचलित डी फार्मसीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनोज पाटीलअप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे व स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने व प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली
 पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी चौक, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा एसटी स्टँड, नवीन एसटी स्टँड व गौतम विद्यालय या प्रमुख पाच ठिकाणी स्वेरी संचलित डी. फार्मसीमधील जवळपास साठ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्तिकी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्यासंबंधी औषधे देवून त्यांच्यातील पायी चालल्यामुळे पायाला होणाऱ्या वेदना कमी करून वारकऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेतली. तसेच शहरातील विविध मठदवाखानेसुरक्षा व्यवस्था, निवास स्थान, भोजन व्यवस्था, मंदिरेनदी आदी वारकऱ्यांसाठी अपरिचित असणारी महत्वाची ठिकाणे याबाबत वारकऱ्यांना व भाविकाना मार्गदर्शन केले. स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाला बहुमोल मदत झाली. यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांनी देखील स्वेरीतील विद्यार्थ्यांची पाठ थोपटली तर स्तुत्य कार्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages