मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार -उद्धव ठाकरे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 10 November 2019

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार -उद्धव ठाकरे

Pandharpur Live Web - मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार, महाराष्ट्रात आपलचं सरकार येणार आहे. मुंबईतील मालाड येथील  हॉटेल द रिट्रिटमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना असा विश्वास दिला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, आपण अजुनही युती तोडलेली नाही असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले असल्याचेही सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे वृत्त असून, त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागल्याचे दिसत आहे.  हॉटेल द रिट्रीट येथे असलेल्या पक्षाच्या आमदारांबरोबर त्यांची सध्या चर्चा  सुरू आहे. तर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी सायंकाळपासून आमदारांबरोबरच असून ते देखील आमदारांचे मत जाणून घेत होते. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यादृष्टीने आता उद्धव ठाकरे आमदारांशी नेमकी काय चर्चा करणार? चर्चेनंतर कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर,काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “अजून निर्णय झालेला नाही. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,”अशी माहिती त्यांनी दिली.


_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

add