राज्यातील सर्व प्रकारच्या योजना ऑनलाईन मग पदवीधर मतदार नोंदणी ऑफलाईन का ? -मुकुंद जाधवर - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Saturday, 23 November 2019

राज्यातील सर्व प्रकारच्या योजना ऑनलाईन मग पदवीधर मतदार नोंदणी ऑफलाईन का ? -मुकुंद जाधवर


Pandharpur Live Web-  –  
 इतर पदवीधर नेते घेणार राज्यपालांची व निवडणूक आयुक्तांची भेट
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्यभरात सर्व विभागात कुठल्याही शासकीय योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे धोरण राज्य व केंद्र शासन राबवत आहे. यामध्ये पीक विमा मागेल त्याला शेततळे तसेच ऑनलाईन नोकरी अर्ज राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचा पदविधरांचा विरोध असताना देखील व या परिक्षाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊन देखील राज्यातील पदविधारांनी आंदोलने करून देखील राज्य शासन ऑनलाईन परिक्षेवर ठाम आहे. मात्र पदवीधर मतदार नोंदणी मात्र ऑफलाईन पद्धतीने करून घेत आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पूर्वीच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या याद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत त्याची नोंदणी त्याच्या नोंदणीची मुदत 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत होती त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदार नोंदणी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान होणार आहे. राज्यामध्ये पुणे विभागात सर्वाधिक पदवीधर मतदार आहेत. परंतु, त्यांच्या नोंदणी बद्दल पदविधारामध्ये राज्य शासनाने जागरूकता केलेली नाही त्यामुळे आत्तापर्यंत पदविधारांच्या संख्येच्या मानाने खूप कमी नोंदणी झाली आहे. ऑफलाईन अर्ज पदविधारांना उपलब्द होत नाहीत नोंदणी ही तहसील कार्यालय व उपविभावीय कार्यालयात अर्ज सादर करून घेण्यात येत आहे. त्याबरोबर ओळखपत्र शैक्षणिक अर्हता कागदपत्र तसेच रहिवासी पुराव्याची कागदपत्र जोडावी लागत आहेत एकत्र गट्टयाने फॉर्म स्वीकारले जात नाहीत त्यामुळे पदवीधर मतदारांना नोंदणीसाठी आपले काम सोडून 1 दिवस नोंदणी करण्यासाठी घालवावा लागत आहे. बहुतांश पदवीधर हे नोकरी व्यवसाय या निमित्य स्थलांतरित झालेले असतात त्यामुळे अश्या किचकट नोंदणी प्रक्रियेत ते नोंदणी करत नाहीत कर्जमाफी अर्ज असतील पीक विमा असे निरक्षरता जास्त असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन च्या प्रक्रियेला समोर जावे लागले व त्यांनी ते केले देखील परंतु, राज्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे माहीत असलेल्या पदविधारांची नोंदणी मात्र ऑफलाईन पद्धतीने करून काही धनदांडग्या विशिष्ट पक्षाच्या लोकांतून निवडून न येऊ शकणाऱ्या उमेदवारांना वर्णी लावण्यासाठी ही प्रक्रिया ऑफलाईन व किचकट ठेवली आहे का तसेच लोकशाही मध्ये जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणे व त्यांना मताचा अधिकार बजावता यावा यासाठी शासनाने व निवडणूक आयोगाने काम करणे गरजेचे आहे तेव्हाच लोकशाही पद्धतीने पदवीधर आमदार निवडला जाईल असा सवाल जाधवर यांनी यावेळी उपस्थित केला. या अश्या नोंदणी प्रक्रियेमुळे प्रत्येक मतदारांना 6 ते 7 कागद म्हणजेच हजारो टन कागद यामुळे वाया जाणार आहे तसेच नोंदणी केलेल्या सर्व मतदारांची डेटा एन्ट्री करण्यासाठी करोडो रुपये खर्च होणार आहे या सर्व बाबीच्या अडचणी राज्यपालांची व मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन सोडवणार असल्याची माहिती दिली.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये खालील प्रमाणे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार यामध्ये  महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ अध्यक्ष मुकुंद जाधवर, जय भगवान महासंघ अध्यक्ष बाळासाहेब सानप, महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटना अध्यक्ष महेश कडूस, जिल्हा परिषद कर्मचारी  युनियन अध्यक्ष सुभाष मरीगुद्दी, राज्य समन्वयक जिल्हा परिषद कर्मचारी संघटना अरुण खरमाटे, ओबीसी संघर्ष समिती जी. डी. तांडेल, कंत्राटी कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष सचिन जाधव, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, बहुजन वंचित आघाडी डॉ. विवेक गुरव, एम. एम. पाटील, सुरेश लवांडे, बाबासाहेब कोकाटे, विकास डेकाटे, सचिन पाटील यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची व निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही जाधवर यांनी सांगितले.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages